Shani Dev Sade Sati 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनी (Shani Dev) कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीवर शनीच्या (Lord Shani) साडेसातीचा प्रचंड प्रभाव असणार आहे. आणि हा प्रभाव तब्बल 7 वर्षांपर्यंत असणार आहे. त्यामुळे शनीच्या साडेसातीच्या दरम्यान मेष रासीच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. 

साडेसातीचा दुसरा चरण फार कठीण 

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनीच्या साडेसातीचे एकूण तीन चरण असतात. पहिला चरण असतो चढत्या साडेसातीचा. दुसरा चरण हा सर्वात कठीण काळ असतो. यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आर्थिकसह अनेक प्रकारे नुकसान पोहोचू शकते. मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण 3 जून 2027 पासून सुरु होणार आहे. या दरम्यान शनीचं राशी संक्रमण होऊन मेष राशीत प्रवेश करणार आहे. 

मेष राशीवर साडेसातीचा प्रभाव 

शनीच्या साडेसाती दरम्यान मेष राशीच्या जीवनात अनेक संकटं येऊ शकतात. या संकटांचा तुम्हाला सामना करावा लागले. तसेच, या काळात तुम्हाला नवीन जॉब शोधण्याची अडचण होईल. तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तसेच, मेहनत करुनही तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच, तुमच्या घरात सतत तणावाच वातावरण निर्माण होईल. जोडीदाराबरोबर वाद होतील. 

साडेसातीचा उपाय 

शनीच्या साडेसातीच्या नकारात्मक प्रभावापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर तुम्ही काही उपाय करु शकता. यासाठी तुम्ही गरजूंना मदत करणं गरजेचं आहे. तसेच, शनिवारच्या दिवशी शनी देवाला तेल अर्पण करा. तसेच, कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. प्रत्येक काम जपून करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                      

Trigrahi Yog 2025 : तब्बल 18 वर्षांनंतर मीन राशीत बनणार 'त्रिग्रही योग'; होळीच्या आधीच उजळणार 'या' 3 राशींचं भाग्य