Mahashivratri 2025: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात महाशिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे. हा उत्सव देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव-पार्वतीची पूजा केल्याने सर्व क्षेत्रात यश मिळते, तसेच जीवनात सुख, समृद्धी प्राप्त होते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही यंदाची महाशिवरात्री विशेष मानली जाते. महाशिवरात्रीपासून काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
महाशिवरात्री सण अत्यंत पवित्र आणि विशेष
हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराचा विवाह माता पार्वतीसोबत झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचे व्रत आणि पूजा केली जाते.
महाशिवरात्रीला हे दुर्मिळ योग तयार होतील
मान्यतेनुसार या दिवशी उपवास केल्याने वर्षभर केलेल्या शिवपूजेचे फळ मिळते. तसेच सर्व पापांचा नाश होतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही यंदाची महाशिवरात्री अतिशय विशेष मानली जात आहे. यंदा महाशिवरात्रीला श्रावण नक्षत्र आणि परिध योग तयार होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानले जातात. यावेळची महाशिवरात्री तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला तीन राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते आणि त्यांना फक्त लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.
महाशिवरात्री कधी असते?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तारीख 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता समाप्त होईल. महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते. त्यामुळे 26 फेब्रुवारीलाच महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे.
कोणत्या आहेत त्या राशी?
मेष - चांगली बातमी मिळू शकते
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी शिवरात्री विशेष फलदायी ठरू शकते. मेष राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यावसायिक लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. व्यवसायातही प्रगतीची संधी मिळेल. याशिवाय वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मिथुन - नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी शिवरात्री खूप शुभ आहे. नोकरदार लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात विस्तार होऊ शकतो.
सिंह - शुभ काळ सुरू होऊ शकतो
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी शिवरात्रीपासून शुभ काळ सुरू होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते. पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा>>>
Astrology: 13 फेब्रुवारी भाग्याचा! 'या' 5 राशींसाठी उघडणार यशाचे दरवाजे! नोकरीत पगारवाढ, करिअरमध्ये प्रगती, धनलाभ, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...