Mahashivratri 2024: शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात. तो दिवस 8 मार्च 2024 रोजी आहे. हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. शिवरात्रीच्या (Mahashivratri 2024)  दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. महाशिवरात्रीचा हे व्रत करताना  काही पदार्थ खाणे वर्ज्य आहे.  आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत आणि पदार्थ खाऊ नये याविषयी आपण जाणून घेणारा आहे. 


उप म्हणजे जवळ, आणि वास म्हणजे वास्तव्य. याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे. उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले दिसतात.  परमेश्वराशी  जवळ राहण्यासाठी उपवास आवश्यक आहे. उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी काही पदार्थ वर्ज्य करायचे आहे. उपवासाबरोबर पूजा देखील महत्त्वाचे आहे. 


महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत? (Mahashivratri What To Eat)



  •  शाबुदाणा खिचडी उपवासाला चालते. मात्र शाबुदाणा खिचडी ही तुपातच बनवावी. तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावी. मात्र शेंगदाणा तेलच वापरावे. 

  • महाशिवरात्रीचा  उपवास हा संपूर्ण दिवस असतो. या दिवशी अती तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

  • अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्याता आहे 

  • बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त प्राधन्यद्यावे

  • निर्जल उपवास केल्याने जास्त अॅसिडीटी होण्याची शक्यता असते.

  • फलाहारी व्रत अनेक लोक करतात. रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे.


महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये? (Mahashivratri What To Not Eat)



  • महशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे.

  • महाशिवरात्रीचे  व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो. 

  • या दिवशी मीठ खाणे वर्ज्य असते. शक्य असेल तर विना मीठाचे पदार्थ खावेत.अन्यथा सैंधव मीठ वापरावे

  • महशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे. तसेच कांदा लसूण, मांसाहर करणे देखील वर्ज्य आहे. 

  • महाशिवरात्रीच्य दिवशी नखे कापू नये

  • अनेकांनाा बोटे मोडण्याची सवय असते. महाशिवरात्री बोटे मोडू नये. 

  • केस कापू नये.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Mahashivratri 2024 : 8 की 9 मार्च यंदा किती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री? मुहूर्त आणि पूजा विधी