MahashivRatri 2024:  यंदा 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्री (MahashivRatri 2024)  साजरी होणार आहे. या विशेष प्रसंगी देशभरातील शिव मंदिरात गर्दी होणार आहे. या शुभ दिवशी अनेक लोक भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. उपवास केल्याने मनाला शांती मिळते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण पूजा करतात. भोलेनाथांना जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जर भगवान शंकराला त्यांची आवडती वस्तू अर्पण केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. इच्छित फळ मिळण्यासाठी भक्त पूजेत शंकराची आवडत्या गोष्टी  अर्पण करतात. यामुळे अनेक फायदे होतात.पण कळत-नकळत जर तुम्ही महादेवाला फूल अर्पण करत असाल तर थांबा कारण फुलामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात.


महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण धतुरा,भांग, बेलपत्र अर्पण करतो. शास्त्राप्रमाणे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगााची फुले वापरली जातात. मात्र प्रत्येक पांढरे फुल प्रिय नाही.  शिव पुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जीत मानले आहे. हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट म्हणजे  होतात म्हणून चुकूनही हे पांढरं सुवासिक फुल महादेवाला अर्पित करू नये.महादेवाला जे फूल अप्रिय आहे, त्याचे नाव आहे केतकी.  केतकीचा महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिव पुराणात आहे. 


शिवपुराणात काय सांगितले?


शिवपुराणाप्रमाणे, एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण? यावरुन  वाद निर्माण झाला. यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश करण्यात आले.  महदेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट करण्यात आले. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यापैकी जो कोणी ज्योतिर्लिंगााचा आद्य आणि  अंत शोधेल तो सर्वोश्रेष्ठ ठरेल. त्यानंतर ब्रह्मा आद्याच्या शोधासाठी खाली तर विष्णू अंताच्या शोधाण्यासाठी वरच्या दिशेने  गेले. खूप शोधल्यानंतर आदी आणि अंत शोधू शकले नाही. त्यावेळी ब्रह्माच्या लक्षात आले की, एक केतकी नावाचे फुल देखील त्यांच्याबरोबर खालच्या दिशेने येत आहे. त्यानंतर ब्रह्माने त्या केतकी फुलाला खोटे बोलण्यास तयार केले आणि त्यानंतर महादेवाकडे गेले.


काय आहे कारण?


महादेवाकडे गेल्यानंतर ब्रह्माने शंकराला ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीचे ठिकाण मला सापडले असे सांगितले. त्याची साक्ष केतकीच्या फुलाला देण्यास सांगितली. परंतु ब्रह्माच्या खोटारडेपणाचा महादेवाला राग आला आणि त्यांनी ब्रह्माचा शिरच्छेद केला. म्हणूनच पंचमुख असणाऱ्या ब्रह्माचे चार मुख राहिले. केतकी फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फुल आपल्या पुजेतून कायमचे वर्जीत केले. त्यामुळे महादेवाच्या पुजेत हे फुल वापरले जात नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Mahashivratri 2024: महाशिवरात्रीचा उपवास करताय? कसा असावा तुमचा आहार? उपवासाला काय खावं आणि काय खाऊ नये?