Maharashtra Weather News : राज्यात तापमानातील (Temperature) चढ उतार कायम आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. काही जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. परभणीत (Parbhani News) सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाली आहे. परभणीत तापमान 6.7 अंशावर गेलं आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह (West Maharashtra) उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला आहे.


राज्यात थंडीचा जोर कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमान हे 10 ते 15 अंशाच्या आसपास आहे. त्यामुळं थंडी वाजत आहे. थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तापमानातील चढ उताराचा शेती पिकांना (Agriculture Crop) फटका बसत आहे. तसेच, अचानक तापमानात मोठी घट होत असल्यानं लहान मुले, वृद्ध नागरिकांना सर्दी, ताप, खोकला असे आजार बळावले आहेत. तर हवेत कायमचा गारवा राहत असल्याने काही भागांत दिवसभर थंडी जाणवत आहे.


कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?


नांदेड : 13.2
सातारा  : 11.7
परभणी : 6.7
जळगाव : 8
नाशिक : 9.6
रत्नागिरी : 16.6
कोल्हापूर : 17.2
मालेगाव : 15.6
ओसबाड : 15.8
हरर्णे : 20.9
पुणे : 8.4
महाबळेश्वर : 13.8
उद्गीर : 14
माथेरान : 20.4
सोलापूर : 14.4
जालना : 17.1
डहाणू : 17.3
जेऊर : 11
औरंगाबाद : 9.4
बारामती : 9.9
सांगली : 14.7
 
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अद्याप थंडीचा जोर कायम आहे. परभणीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तिथे 6.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तिथे थंडीचा कडाका कायम आहे. दुसरीकडे जळगाव 8 अंश तर पुणे 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर परिणाम


राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. याचा शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर देखील करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार बसत आहे. त्यामुळं उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांच्या हातातून वाया गेली आहेत. त्यात आता रब्बी पिकांनाही हवामान बदलाचा फटका बसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Weather : परभणीसह पुण्यात गारठा वाढला, दोन्ही ठिकाणी एक अंकी तापमान; थंडी वाढल्यानं आजार बळावले


Maharashtra Weather Forecast Updates Cold Weather in all over State including Parbhani Nashik Pune Nagpur Aurangabad