Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह, देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि इतर अपडेट्स पाहा एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या

ज्योती देवरे Last Updated: 28 Feb 2025 02:49 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड कोर्टात चालवण्यासाठी एसआयटीची कोर्टाला विनंती अर्ज

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड कोर्टात चालवण्यासाठी एसआयटीची कोर्टाला विनंती अर्ज  .
 
खटला केज न्यायालयातच चालवावा लागणार, बीड जिल्ह्या न्यायालयाचे एसआयडीला निर्देश. 


बीड न्यायालयात खटला चालवण्यासाठी हाय कोर्टाची परवानगी घ्या.. 


सुरक्षेच्या दृष्टीने केज ऐवजी बीड न्यायालयात चालवला ही होती एसआयडीची विनंती..

Accident News: भिषण अपघातात कारचा चक्काचूर; अपघाताचे सीसीटीव्ही आले समोर

Accident News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरानजीक चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय.. भरधाव कारने रात्री बारा वाजेच्या सुमारास नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिली.. या अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलचा बोर्ड आणि संरक्षक भिंतीला जाऊन धडकली.. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कार मधील तरुण तरुणी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर शिर्डीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित, नेमकं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार बैठकीला अनुपस्थित 


बाहेरगावी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित असल्याची रोहित पवार यांच्या कार्यालयाची माहिती 


तब्येतीच्या कारणास्तव मागील काही दिवसांपासून रोहित पवार माध्यमांपासून दूर होते सध्या मात्र त्यांची तब्येत चांगली असल्याची तसेच अर्थ संकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची पवारांच्या कार्यालयाची माहिती

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक 

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक 


मुंबईतील आरोपी संतोष खोतला  पोलिसांकडून तुळजापुरात अटक 


संगीता गोळे या मुंबईतील महिलेच्या अटक कारवाईनंतर ड्रग्ज प्रकरणात संतोष खोत हा मुंबईतील दुसरा आरोपी अटक


तामलवाडी टोल नाक्यावर ड्रग्जसह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर ड्रग्ज रॅकेटचा उलगडा


तुळजापुरातील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज  प्रकरणात चौकशी केल्याची माहिती

Dharashiv  Bird Flu: धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर

धाराशिव मध्ये बर्ड फ्लू  धाराशिव मध्ये बर्ड फ्लू चा एक संशयित रुग्ण 


ढोकी येथील मांस विक्री करणाऱ्या व्यक्तीला लक्षण, तापाने फणफणलेल्या व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू


आरोग्य विभागाकडून संशयित रुग्णाचा तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आला


पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरालॉजी प्रयोगशाळेकडे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याची आरोग्य विभागाची माहिती


धाराशिव मधील ढोकी येथे कावळ्याच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा शिरकाव, गावापासून दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित केलेला 


पशुसंवर्धन आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर, ढोकी येथील चिकन विक्रीची दुकान बंद 


परिसरातील कुकुट पक्षाचे सर्वेक्षण सुरू, कावळे आणि कोंबड्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला लक्षने आढळल्यास तपासणी केली जाणार

Accident News : एसटीची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू; सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील घटना 

Accident News: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर दोड्डी फाट्याजवळ एसटी दुचाकीला धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तर बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत. प्रदीप सोमवंशी या दुचाकी चालकाचा यात मृत्यू झाला. तर सतीश सोमवंशी हा जखमी झाला आहे. हैदराबाद रोडवरून सोलापूरकडे एसटी बस येत होती. एसटीमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते. हैदराबाद-सोलापूर महामार्गावरील दोड्डी फाट्याजवळ समोर जाणाऱ्या दुचाकीला एसटीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेत बसमधील प्रवासी ही जखमी झाले आहेत.

भायखळातील सॅलसेट-27 बिल्डिंगला आग; आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न

भायखळा पूर्वेला असलेल्या न्यू ग्रेड इन्स्टा मिलजवळील सॅलसेट 27 बिल्डिंगला आग लागल्याची घटना घडली आहे.


लेवल वनची आग असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आला आहे. 
घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा काम सुरू आहे..

Nagpur Crime News :  जैन मंदिरातुन प्राचीन मूर्तीची चोरी,घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nagpur Crime News :  नागपुरातील जैन मंदिरातुन प्राचीन मूर्तीची चोरी झाली असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. शहरतील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील श्री शीतल नाथ दिगंबर जैन मंदिरात ही चोरीची घटना घडली आहे. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोराचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Jalna Crime News : जुन्या वादातून लोखंडी रॉडने चटके देत मारहाण; उबाठा गटाच्या तालुका अध्यक्षासह भावा विरोधात गुन्हा

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या अन्वा गावात दोन आरोपीकडून एका व्यक्तीस लोखंडी रॉडने चटके  देऊन मारहाण केल्याची  घटना समोर आलीय. कैलास बोराडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, जुन्या वादातून आरोपी  ही मारहाण केल्याची माहिती आहे. बोराडे हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता जुन्या वादातून आरोपी सोबत बाचाबाची होऊन जवळच असलेल्या एका पेटत्या चुलीत रॉड टाकून सदर आरोपींनी चटके दिल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या प्रकरणी उबाठाचा तालुकाध्यक्ष नवनाथ दौड आणि त्याच्या भावा विरोधात पारध पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदेश काँग्रेसच्या वेगवेळ्या सेलच्या कार्यकारणी लवकरच होणार बरखास्त; सूत्रांची माहिती

प्रदेश काँग्रेसच्या वेगवेळ्या सेलच्या कार्यकारणी लवकरच होणार बरखास्त ...


एबीपी माझा ला सूत्रांची माहिती...


संघटन मजबूती साठी वेगवेगळ्या सेलच्या नवीन कार्यकारणीच्या निवडीवर प्रदेश अध्यक्षांचे काम सुरू...


अनुभवी नेत्यांसह नवीन चेहऱ्यांना दिली जाणार संधी...

Share Market: सेन्सेक्स 900 हून अधिक अंकांनी कोसळला, निफ्टी देखील 250 हून अधिक आपटला 

Share Market: सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी कोसळला 


निफ्टी देखील २५० हून अधिक आपटला 


बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या समभाग कोसळले


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करावरील ताज्या टिप्पण्यांनंतर सुस्ती 


बीएसई मार्केट कॅप ६ लाख कोटींनी घसरली, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान 


चिपमेकर एनव्हिडियाच्या घसरणीमुळे अमेरिकेतील बाजार कोसळले 


अशातच भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज पर्सिस्टंट सिस्टम्स, टेक महिंद्राच्या समभागात घसरण

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये


डॅमेज कंट्रोल करण्यात संजय राऊत यशस्वी होणार का याकडे लक्ष


ठाकरे गटातुन माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पुन्हा  शिवसेना शिंदें गटात जाणार असल्याच्या चर्चना उधाण


पक्षातील गटबाजी आणि गळती रोखण्याचे संजय राऊत यांच्यापुढेमोठे आव्हान


आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक


शिंदे गटाकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के दिले जात असल्याने ठाकरे गट ऍक्शन मोडवर

Karad: कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले 

Karad: कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले 


शिंदे कुटुंबातील नीलम शिंदेचा अमेरिकेत मृत्यूशी संघर्ष


अमेरिकेत अपघात झाल्यानं नीलम शिंदेवर आयसीयूत उपचार


पालकांना अमेरिकेत जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता


मंत्री आणि नेत्यांकडून देखील कोणतीही मदत मिळत नव्हती 


अशात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदत केल्याने व्हिसा मिळाला आहे

Mira Bhayander : मीरा भाईंदरमधील दिवाणी न्यायालयाचे 8 मार्चला उद्घाटन

Mira Bhayander : मीरा भाईंदरमधील दिवाणी न्यायालयाचे 8 मार्चला उद्घाटन


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन होणार 


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात एकत्र दिसणार


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उद्घाटन केलं जाणार 


मीरा-भाईंदरमध्ये स्वतंत्र न्यायालय आणि प्रशासकीय कार्यालयं असावी अशी अनेक वर्षांपासूनची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी 


बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं

Mumbai: मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सपवर धमकीचा मेसेज

Mumbai: मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याचा मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सपवर धमकीचा मेसेज. 


वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.


पाकिस्तानी नंबरवरून ट्रैफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर हा धमकीचा मेसेज आला होता.


बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपासयंत्रणा अलर्ट मोडवर.


मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले आहे.


मेसेज करणारी व्यक्ती भारतातील की बाहेरील याचा तपास सुरू..

Beed: बीडच्या कारागृहात वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप

Beed: बीडच्या कारागृहात वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप


देशमुख कुटुंबाकडून कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार


जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप

Maharashtra: राज्यात 15 जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करणार 

Maharashtra: राज्यात १५ जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करणार 


मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरीकरणाचा वेग लक्षात घेता नवीन उपविभागीय अधिकाऱ्यांची कार्यालये निर्मितीची तयारी


प्रस्तावावर सादरीकरण, मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर चर्चा 


राज्यभरात १३ महसूल उपविभागांची निर्मिती करणार


महसूल विभाग लोकाभिमुख करण्याचा मंत्री बावनकुळे यांचा प्रयत्न

Buldhana: आता लोणार सरोवर परिसरात करता येणार प्री वेडिंग शूट, पुरातत्त्व विभागाने आता नवीन नियम लागू केले

Buldhana: आता लोणार सरोवर परिसरात करता येणार प्री वेडिंग शूट.


35 हजार रुपयांचे शुल्क भरून लोणार परिसरात प्रि वेडिंग शूट.


जगप्रसिद्ध लोणार सरोवरात आणि परिसरात प्री-वेडिंग शूट साठी भारतीय पुरातत्त्व विभागाने आता नवीन नियम लागू केले आहेत.


या नियमानुसार या परिसरात प्री-वेडिंग शूट साठी ३५००० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.


त्यामुळे आता लोणार सरोवर या जगप्रसिद्ध वारसा स्थळाच्या परिसरात इच्छुक जोडप्यांना प्री-वेडिंग शूट करता येणार आहे 

Dapoli: दापोलीत उध्दव गटाला आणखी मोठा धक्का, उर्वरित आठ नगरसेवकही घेणार धनुष्यबाण हाती.

Dapoli: दापोलीत उध्दव गटाला आणखी मोठा धक्का, उर्वरित आठ नगरसेवकही घेणार धनुष्यबाण हाती.


5 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेमधील प्रवेशा नंतर उर्वरित आठ नगरसेवकही घेणार धनुष्यबाण हाती.


उपनगराध्यक्ष  खालिद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह  सहा नगरसेवकांचा आज शिवसेनेत होणार जाहीर प्रवेश.


राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा


नगरसेवकांचा एक गट शिवसेनेचा झाल्यामुळे दापोली नगर पंचायतवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसण्याचा मार्ग मोकळा.


17 नगरसेवकांपैकी 14 नगर सेवक शिंदेच्या शिवनेत...उध्दव गटासह राष्ट्रवादी आणि भाजपकडे केवळ एक -एक नगर सेवक.

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर मध्ये बारावीच्या परीक्षेत 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर मध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये ओहर जटवाडा येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रांत जीवशास्त्र  विषयाच्या पेपर देणाऱ्या 125 विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये बसवून सामूहिक कॉपी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


केंद्रातील परीक्षा खोलीला लागूनच संस्था सचिवाच्या कार्यालयात अत्याधुनिक झेरॉक्स मशीनही तहसीलदारांच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आली.


या गैरप्रकाराचा पंचनामा करून तहसीलदारांच्या पथकाने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ बोलावून घेतले.


त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.



छत्रपती संभाजीनगरपासून 10 किलोमीटर अंतरावरील ओहर या गावात बारावी, दहावीचे परीक्षा केंद्र आहे

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ 6 मार्च रोजी पन्हाळगडावर

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ 6 मार्च रोजी पन्हाळगडावर


पन्हाळगडचा रणसंग्राम या लघुपटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार


पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी दिली माहिती


लघुपटाचा आणि 13 D थिएटर चा लोकार्पण सोहळा होणार

Bhandara: भंडाऱ्यात आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण

Bhandara: भंडाऱ्यात आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण


तरुणी म्हणते, मी स्व:मर्जिनं विवाह केला....तर, तिच्या कुटुंबीयांची युवकाविरोधात फुस लावून पळवून नेल्याची तक्रार


भंडाऱ्यात आंतरधर्मीय विवाह पार पडला असून २२ वर्षीय तरुणी आणि २४ वर्षीय युवक यांचे दोघांचेही धर्म वेगवेगळे आहेत.


आंतरधर्मीय विवाह असल्यानं या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध होईल म्हणून तरुणींनं पोलिसांकडं स्व:मर्जीनं विवाह करीत असल्याची माहिती दिली.


त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांना या आंतरधर्मीय विवाहाची माहिती मिळाली आणि त्यांनी पण रात्री उशिरा युवकांनं त्यांच्या मुलीला फूस लावून पळून नेल्याची लेखी तक्रार पोलिसात असून युवक विरुद्ध भादंवी ८७ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.


कुटुंबीय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आज दुपारी १२ वाजेपर्यंत तरुणाला अटक करण्याचा पोलिसांना अल्टिमेटम दिला आहे.


अन्यथा भंडाऱ्यात आंदोलन पुकारू, असं अल्टिमेटमध्ये म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून अद्याप कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

Washim: वाशिम शहरात सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

Washim: वाशिम शहरात सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल


आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर एका१९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक वाशिम शहरात घडली


घटनेचा प्रकार २६ फेब्रुवारी संध्याकाळच्या सुमारास घडला. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी


आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून,


आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Parbhani: गृहमंत्री अन् मुख्यमंत्री म्हणुन तुम्ही लायक नाहीत, स्वारगेट अत्याचार प्रकरणी कॉम्रेड नरसय्या आडम फडणवीसांवर बरसले

Parbhani: गृहमंत्री अन मुख्यमंत्री म्हणुन तुम्ही लायक नाहीत-दोन्ही मंत्रिपदाचा राजीनाना द्या 


स्वारगेट अत्याचार प्रकरणी कॉम्रेड नरसय्या आडम फडणवीसांवर बरसले 


परभणीच्या सेलुत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ३ दिवसीय २४ व्या अधिवेशनाला सुरूवात 


देशात सर्व काही केवळ काही उद्योगपतींसाठी सुरू सामान्य शेतकरी कष्टकरी आत्महत्या करतोय 


कॉम्रेड प्रकाश कारत यांनी केली मोदींवर टीका

Dharashiv: तुळजाभवानी देवीच्या दरबारात मंदिर संस्थानचा तुघलकी कारभार, नोकरीसाठी कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर लूट 

Dharashiv: तुळजाभवानी देवीच्या दरबारात मंदिर संस्थानचा तुघलकी कारभार, नोकरीसाठी कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर लूट 


मंदिर संस्थानने कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले


मंदिर संस्थानकडून 62 नवीन वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 


39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थानने 78 लाख रुपये केले सक्तीने वसूल


तर इतर कर्मचाऱ्यांकडून महिन्याच्या पगारातून सक्तीने बँक गॅरंटीचे पैसे केले जात आहेत कपात, सक्तीच्या वसुलीमुळे कर्मचारी मेटाकुटीला


कर्ज काढून मंदिर संस्थानची बेकायदेशीर बॅक गॅरंटी भरण्याची कर्मचाऱ्यांवर नामुष्की

Buldhana - बुलढाण्यातील केस गळती प्रकरण, केस गळती झालेल्या नागरिकांना पुन्हा केस यायला सुरुवात.

Buldhana - बुलढाण्यातील केस गळती प्रकरण.
         - केस गळती झालेल्या नागरिकांना पुन्हा केस यायला सुरुवात.
         - दोन महिन्यांपासून तणावात असलेल्या नांगरिकांत आनंदच वातावरण.

Pune: पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची वैद्यकीय तपासणी, 11 वाजेपर्यंत शिवाजीनगर कोर्टात हजर करणार

Pune: पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेची वैद्यकीय तपासणी झाली आता काही वेळापूर्वी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते..


 11 पर्यंत पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करतील ...

Pune: पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांकडून अटक

Pune: स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 


त्याला गुनाट गावातून ताब्यात घेण्यात आलं आहे.


अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. 


दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास  26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. 


ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा इथं पाहायला मिळेल. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुनाट गावातून ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.