Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलतात. कधी ग्रह सरळ चालीत असतात, तर कधी वक्री चालीत, म्हणजेच उलट्या चालीत, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच देशावर आणि संपूर्ण जगावर दिसून येतो. 2025 मध्ये अनेक ग्रह सरळ आणि वक्री चालीत चालणार आहेत. ज्यामध्ये बुध, शुक्र, शनि आणि गुरु या ग्रहांचा समावेश आहे. या ग्रहांच्या वक्री चालीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल, परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांचं नशीब 2025 मध्ये उजळू शकतं, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृश्चिक रास (Scorpio)


4 ग्रहांची उलटी चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, या काळात तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्याच वेळी, तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी तुम्ही अनेक स्त्रोतांकडून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांची उलटी चाल शुभ ठरू शकते. नोकरदारांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. त्याचबरोबर बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. याशिवाय, तुमची संवाद साधण्याची क्षमता देखील सुधारेल. व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला अशा अनेक ऑफर मिळतील, ज्या तुमच्यासाठी व्यवसायात फायदेशीर ठरतील. या काळात तुम्ही घर किंवा फ्लॅट खरेदी करू शकता.


कर्क रास (Cancer)


4 ग्रहांची वक्री चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. या काळात तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्हाला नवीन व्यवसाय भागीदार किंवा गुंतवणूकदार देखील मिळू शकतात. व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा नफा मिळेल. यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : पुढचे 101 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 'या' 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीच्या संधीही येणार चालून


Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, जगणार राजासारखं जीवन