एक्स्प्लोर

Mahakal Bhasma Aarti: उज्जैनच्या महाकाल 'भस्म आरती दर्शन' प्रक्रियेत मोठा बदल! भाविकांना लांब रांगांपासून दिलासा, नेमका काय बदल? कधी आणि कसे बुकिंग कराल?

Mahakal Bhasma Aarti: महाकाल भस्म आरती दर्शनच्या 'तात्काळ बुकिंग' मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे भाविकांना लांब रांगेपासून दिलासा मिळाला आहे.

Mahakal Bhasma Aarti: उज्जैनचे महाकाल...महाकालेश्वर मंदिर (Ujjain Mahakal) हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात असलेले भगवान भोलेनाथाचे हे मुख्य मंदिर आहे. स्वयंभू, भव्य आणि दक्षिणाभिमुख असल्यामुळे महाकालेश्वर महादेवाला प्रचंड पुण्यमूल्य आहे. असे मानले जाते की, या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने मोक्ष मिळतो. याच बाबा महाकालचं दर्शन घेण्यासाठी लोक देश-विदेशातून येतात. गर्दी असल्याने अनेकांना लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र बाबा महाकालच्या भस्म आरती दर्शनासाठी लांब रांगांपासून आता दिलासा मिळाला आहे, जाणून घेऊया नेमका काय बदल झाला आहे. 

उज्जैन महाकालच्या भस्म आरतीसाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही? (Mahakal Bhasma Aarti)

उज्जैनच्या जगप्रसिद्ध महाकाल मंदिरातील भस्म आरती दर्शनाबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. भाविकांना आता लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. मंदिर प्रशासनाकडून प्रणालीमध्ये बदल करून 'इन्स्टंट ऑनलाइन बुकिंग' म्हणजेच तात्काळ ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयीस्कर होईल अशी अपेक्षा आहे. पूर्वी, भस्म आरतीसाठी भाविकांना एक दिवस आधी मंदिरात यावे लागत असे. त्यांना एक अर्ज मिळवून, तो भरून सादर करावा लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ होती. आता, संपूर्ण प्रणाली ऑनलाइन करण्यात आली आहे. आता घरबसल्या भस्म आरती दर्शनासाठी सहज बुकिंग करणे शक्य आहे. महाकाल भस्म आरती दर्शनासाठीच्या 'इन्स्टंट बुकिंग'मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत. 

कधी आणि कसे बुकिंग कराल?

मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार आणि नवीन प्रणालीनुसार, भाविक आदल्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ऑनलाइन पोर्टलद्वारे बुकिंग करू शकतात. ही प्रक्रिया 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर आधारित असेल. त्यामुळे, वेळेवर लॉग इन करणे आवश्यक असेल.

आधार कार्ड आवश्यक

ऑनलाइन बुकिंग करताना आधार कार्डचा तपशील देणे अनिवार्य आहे. यामुळे ओळख पडताळणी सुलभ होईल. संपूर्ण प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे, जेणेकरून सर्व वयोगटातील लोक ती सहजपणे वापरू शकतील.

शुल्क किती?

भस्म आरती दर्शनाचे शुल्क प्रति व्यक्ती 200 रुपये आहे. पूर्वीप्रमाणेच, दररोज फक्त 300 भाविकांना परवानगी दिली जाईल. मर्यादित संख्येमुळे, स्लॉट लवकर भरू शकतात.

गर्दी आणि हवामानाच्या त्रासातून सुटका

या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भाविकांना गर्दी आणि हवामानाच्या त्रासातून सुटका मिळेल. उन्हात, पावसात किंवा थंडीत रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या आरामात बुकिंग करणे शक्य आहे.

आणखी काही बदल होऊ शकतात का?

सध्या, ही प्रणाली 9 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. ऑफलाइन प्रणालीबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. जर ऑनलाइन प्रणाली यशस्वी झाली, तर ती कायमस्वरूपी केली जाऊ शकते.

भाविकांसाठी महत्त्वाचा सल्ला

बुकिंग करताना चांगल्या इंटरनेट कनेक्शनची खात्री करा. तुमच्या आधार कार्डचा तपशील आगाऊ तयार ठेवा. सकाळी 8 वाजण्यापूर्वी पोर्टल उघडण्यासाठी तयार राहा, कारण उशीर झाल्यास स्लॉट पूर्ण भरू शकतात.

ही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात मोठं वळण! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
Embed widget