Magh Maas 2024 : हिंदू धर्मात माघ (Magh) महिन्याचं विशेष महत्त्व आहे. आजपासून, म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून माघ मास सुरू झाला आहे. पंचांगानुसार, माघ हा वर्षाचा 11 वा महिना आहे. पौष अमावस्येच्या समाप्तीनंतर माघ महिना सुरु होतो. धार्मिक मान्यतेनुसार, माघ महिना खूपच पवित्र आहे. या महिन्यात गंगेत स्नान करण्याला आणि दानाला विशेष महत्त्व आहे. यासोबतच या महिन्यात सूर्यदेव, श्रीकृष्ण आणि विष्णूची पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा पुण्यप्राप्तीचा आहे. या महिन्यातील शुभ दिवस, सण आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.


हिंदू कॅलेंडरनुसार, आजपासून (10 फेब्रुवारी) माघ महिन्याला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मात माघ महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दान, स्नान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या महिन्यात लोक गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वार, प्रयागराजसारख्या धार्मिक स्थळी जातात. धार्मिक दृष्टिकोनातून गंगेत स्नान करणारी व्यक्ती शरीर आणि आत्म्याने पवित्र बनते, असा समज आहे. 10 मार्चला अमावस्येनंतर हा माघ महिना संपणार आहे. 


स्नान-दानाचे महत्त्व (Significance of Snan-Daan)


माघ महिन्यात पवित्र नदीत स्नान आणि दान इत्यादी अतिशय शुभ मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, माघ महिन्यात इंद्रदेवाला गौतम ऋषींनी शाप दिला होता. आपली चूक लक्षात घेऊन इंद्रदेवाने गौतम ऋषींची माफी देखील मागितली, त्यावेळी गौतम ऋषींनी इंद्रदेवाला माघ महिन्यात गंगेत स्नान करून चुकांचं प्रायश्चित्त करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी याच महिन्यात गंगेत स्नान केलं. इंद्राला गंगेत स्नान केल्यावरच शापापासून मुक्ती मिळाली. तेव्हापासून माघ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावास्येला गंगेत स्नान करण्याचं विशेष महत्त्व मानलं जातं. 


माघ महिन्यात करा हे उपाय (Magh Maas Remedies)


माघ महिन्यात अनेक धार्मिक सण येतात, तसेच निसर्गही अनुकूल होऊ लागतो. या महिन्यात संगमावर कल्पवास देखील केला जातो, यामुळे व्यक्तीचं शरीर आणि आत्मा पवित्र होतो. माघ महिन्याच्या सकाळी श्रीकृष्णाला पिवळी फुलं अर्पण करून पंचामृत अर्पण करावं. माघ महिन्यात कृष्णाच्या मंत्रांचा जप करावा आणि पवित्र नदीत स्नान करावं. एखाद्या गरीबाला नियमित अन्नदान करावं. शक्य असल्यास या महिन्यात एकाच वेळी जेवण करा.


माघ महिन्यातील व्रत-उत्सव (Magh 2024 Festivals)



  • 10 फेब्रुवारी 2024 - माघ मासारंभ

  • 13 फेब्रुवारी 2024 - गणेश जयंती

  • 14 फेब्रुवारी 2024 - वसंत पंचमी

  • 16 फेब्रुवारी 2024 - रथ सप्तमी, भीष्म अष्टमी

  • 17 फेब्रुवारी 2024 - दुर्गाष्टमी

  • 20 फेब्रुवारी 2024 - जया एकादशी

  • 21 फेब्रुवारी 2024 - प्रदोष व्रत

  • 22 फेब्रुवारी 2024 - गुरूपुष्यामृतयोग

  • 24 फेब्रुवारी 2024 - पौर्णिमा

  • 25 फेब्रुवारी 2024 - गुरु प्रतिपदा

  • 28 फेब्रुवारी 2024 - संकष्ट चतुर्थी

  • 3 मार्च 2024 - भानु सप्तमी, कालाष्टमी

  • 6 मार्च 2024 - विजया स्मार्ता एकादशी

  • 7 मार्च 2024 - भागवत एकादशी

  • 8 मार्च 2024 - महाशिवरात्री

  • 10 मार्च 2024 - माघ अमावस्या


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Maghi Ganesh Jayanti: माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, पूजा पद्धत