Maghi Amavasya 2024 : पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात अमावस्या (Amavasya) आणि पौर्णिमा तिथी येते. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि अमावस्या येतात. त्यानुसार, सध्या माघ महिना सुरू असून आज, म्हणजेच 10 मार्चला माघी अमावस्या असेल आणि यासोबतच माघ महिन्याची समाप्ती होईल आणि फाल्गुन महिना सुरू होईल. परंतु, माघी अमावस्येच्या तिथीबद्दल अनेकजण सध्या संभ्रमात आहेत, याबद्दल जाणून घेऊया. घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी काही उपायांबद्दल देखील जाणून घेऊया.


अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्यं केली जातात. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. कालसर्प दोष आणि पितृदोषापासून मुक्तीसाठीही या दिवशी उपवास केला जातो. अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानालाही विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात आनंद नांदतो. 


माघी अमावस्या प्रारंभ आणि समाप्ती वेळ 


पंचांगानुसार, माघी अमावस्या 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सुरू झाली आणि 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी समाप्त होईल. शास्त्रानुसार आणि उदयातिथीनुसार अमावस्या वैध आहे, म्हणून माघ अमावस्या आज, म्हणजेच 10 मार्च रोजी असणार आहे.


स्नानाचा शुभ मुहूर्त


अमावस्येच्या दिवशी स्नानाची वेळ पहाटे 4:49 ते 5:48 पर्यंत असेल. या वेळेत अंघोळ केल्याने व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते.


कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय


अमावास्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद, सुख-समृद्धी नांदते. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा. कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो. 


माघ अमावस्येच्या दिवशी करा या गोष्टी



  • या दिवशी नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांना नमस्कार करावा.

  • पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी व्रत करा आणि एखाद्या गरीबाला दान-दक्षिणा द्या.

  • अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करा. पिंपळाला सात प्रदक्षिणा घाला.

  • रुद्र, अग्नी आणि ब्राह्मण यांची पूजा केल्यानंतर त्यांना उडीद, दही, पुरी इत्यादींचा नैवेद्य दाखवावा आणि तेच पदार्थ एकदा सेवन करावे.

  • शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्च्या गाईचं दूध, दही, मध यांचा अभिषेक करा आणि काळे तीळ अर्पण करा.

  • अमावस्या हा शनिदेवाचा दिवसही मानला जातो, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा करणं आवश्यक आहे. अमावस्येला शनि मंदिरात निळी फुलं अर्पण करा. काळे तीळ, काळी अख्खी उडीद डाळ, काजल आणि काळे वस्त्र अर्पण करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती