Lunar Eclipse 2022 : आज 2022 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan) होणार आहे. सूर्यग्रहणाच्या 15 दिवसानंतर म्हणजे देव दिवाळीनंतर हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) लागणार आहे. 2022 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी लागलं होतं. आणि आज वर्षातलं हे शेवटचं अंतिम पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे.


चंद्रग्रहणाची वेळ कितीची आहे?


भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 8 नोव्हेंबर रोजी ग्रहण IST दुपारी 2.39 वाजता सुरू होईल, एकूण ग्रहण IST दुपारी 3.46 वाजता सुरू होईल. संपूर्णत: जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असेल तेव्हा ग्रहणाचा टप्पा IST संध्याकाळी 05.11 वाजता संपेल आणि ग्रहणाचा आंशिक टप्पा IST संध्याकाळी 6.19 वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर 07.26 वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.


चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी किती असेल?


देशाच्या पूर्वेकडील कोलकाता आणि गुवाहाटी शहरात चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा पूर्ण टप्पा सुरू होणार आहे. कोलकातामध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 20 मिनिटांचा असेल आणि चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 1 तास 27 मिनिटांचा काळ असेल. गुवाहाटीमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्प्याच्या समाप्तीपर्यंतचा कालावधी 38 मिनिटांचा असेल, तर तेथे चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी 1 तास 45 मिनिटांचा काळ असेल.


'या' देशांतसुद्धा दिसणार चंद्रग्रहण :


आज दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण हे भारताबरोबरच इतरही देशांत दिसणार आहे. यामध्ये आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, या शहरांचा समावेश आहे. तसेच, पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल. मात्र,  चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारताबाहेर आज भारतीय वेळेनुसार पारी 01.32 वाजता छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. 02.39 वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. 03.46 वाजता खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. तर, 05.11 मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. 06.19 वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर 07.26 वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.


चंद्रग्रहणाच्या वेळी 'ही' खबरदारी घ्या :


ग्रहण काळात खाण्यापिण्याचे पदार्थ खाऊ नका, अन्न शिजवू नका. ग्रहणाच्या काही वेळ आधी अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकावीत. असे केल्याने चंद्रग्रहणाचा परिणाम होणार नाही, असे मानले जाते. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातून किंवा खोलीतून बाहेर पडू नये. असे मानले जाते की ग्रहण काळात बाहेर जाण्याने मुलामध्ये शारीरिक व्यंग येते.


महत्वाच्या बातम्या : 


Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणाच्या वेळी घ्या 'ही' खबरदारी, त्याच्या प्रभावापासून मिळेल मुक्ती