Chandra Grahan 2022 : 2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) होणार आहे. या वर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण असेल. भारतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या (Tripurari Purnima) दिवशी यंदा खग्रास चंद्रग्रहण आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. भारतात चंद्रग्रहण दिसल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असेल. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे, तर इतर ठिकाणी आंशिक चंद्रग्रहण दिसेल. 08 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चंद्र उगवताच त्याच वेळी भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे. 



चंद्रग्रहणाच्या वेळा, सुतककाळ आणि वेध काळ 
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार, 08 नोव्हेंबर रोजी, 2022 वर्षातील शेवटचे ग्रहण देशात आणि जगात दिसणार आहे. हे ग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल. भारतामधील चंद्रग्रहणाची सर्वसाधारण वेळ ही संध्याकाळी 5 वाजून 32 मिनिटं ते 7 वाजून 27 मिनिटं इतकी आहे. चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित असल्याने 8 नोव्हेंबर दिवशी सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत ग्रहणाचे वेध पाळले जातील. लहान मुलं, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता वेध पाळण्याचा कालावधी सकाळी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळेस काही नियम पाळण्याची रीत आहे.



भारताशिवाय 'या' ठिकाणी दिसणार चंद्रग्रहण 
भारताशिवाय 8 नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिकमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला देव दीपावलीच्या तारखेला होईल, आम्ही तुम्हाला सांगतो की 25 ऑक्टोबर रोजी झालेले वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण देखील दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक अमावस्या तिथीला झाले होते. हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी दिसणार आहे.



भारतात चंद्रग्रहण किती वाजता सुरू होईल?
चंद्रग्रहणाची तारीख: 08 नोव्हेंबर, सोमवार 2022
चंद्रग्रहण वेळ: संध्याकाळी 05.32 ते 07.27 पर्यंत
चंद्रोदयाची वेळ - 08 नोव्हेंबर संध्याकाळी 5:28 वाजता


तुमच्या शहरात कधीपासून सुरू होणार चंद्रग्रहण?


शहर         कधी सुरू      शहर        कधी सुरू
दिल्ली            5.28        नोएडा       5.30
अमृतसर        5.32        लखनौ       5.16
भोपाळ          5.36        लुधियाना    5.34
जयपूर           5.37        शिमला       5.20
मुंबई             6.01        कोलकाता   4.52
रायपूर           5.21        पाटणा        5.00
इंदूर              5.43        डेहराडून    5.22
उदयपूर         5.49        गांधीनगर    5.55


भारतात कुठे दिसणार चंद्रग्रहण?
दिवाळीनंतर आता कार्तिक पौर्णिमेलाही चंद्रग्रहण दिसणार आहे. १५ दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल. हे संपूर्ण चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे. भारताच्या काही भागांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल तर बहुतांश भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. भारतात ग्रहणाची सुरुवात 08 नोव्हेंबर रोजी चंद्रोदयाने होईल.


येथे संपूर्ण चंद्रग्रहण देशात दिसणार
भारतात 08 नोव्हेंबरच्या संध्याकाळी चंद्र उगवताच, पहिले चंद्रग्रहण ईशान्य दिशेला दिसेल. पहिले पूर्ण चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशात दिसणार आहे.


देशाच्या 'या' भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसणार 


आंशिक चंद्रग्रहण ईशान्येचा भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात दिसणार आहे.


संपूर्ण चंद्रग्रहण येथे पाहता येईल
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, ईशान्य युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या बहुतांश भागात दिसणार आहे.


वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येथे दिसणार नाही
08 नोव्हेंबर रोजी ग्रहण दक्षिण पश्चिम युरोप आणि आफ्रिकेत दिसणार नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


 Chandra Grahan 2022 : 'या' राशींसाठी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ठरणार अशुभ, चुकूनही करू नका 'हे' काम