एक्स्प्लोर

Libra Horoscope Today 23 April 2023 : तूळ राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल; आजच्या दिवशी 'हे' काम करु नका

Libra Horoscope Today 23 April 2023 : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे.

Libra Horoscope Today 23 April 2023 : तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीचे काही टेन्शन असू शकते. आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. बँकिंग आणि आयटी नोकऱ्यांशी संबंधित लोकांच्या पदोन्नतीवर चर्चा होईल. तब्येतीत सतत होणारे चढ-उतार तुम्हाला त्रास देतील. व्यवसाय किंवा नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. तुम्हाला नवीन वाहनाचा आनंद मिळेल, तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. 

रागावर नियंत्रण ठेवा 

करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. काही बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल आणि तुम्हाला चांगला नफा होऊ शकेल. इलेक्ट्रिकल्स कामाशी संबंधित लोकांना फायदा होईल. तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कामात लाभाची स्थिती राहील. नोकरदार वर्गातील कर्मचारी पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी बोलून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. 

गुंतवणूक करू शकता

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. भाषेच्या मर्यादा लक्षात ठेवा. कुटुंब प्रमुख घरातील सदस्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तेही करु शकता. तुमच्या आर्थिक जीवनात समृद्धी येईल, यासोबतच तुम्ही सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता. 

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

तूळ राशीच्या लोकांना आज छातीत दुखण्याची समस्या भासू शकते. हृदयरोगींनी कोणत्याही प्रकारच्या औषधांबाबत निष्काळजीपणा करु नये. औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा आणि त्या पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्पण करा.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 April 2023 : मेष, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget