Libra Horoscope Today 10 December 2023 : तूळ राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल; आजच्या दिवशी 'हे' काम करु नका
Libra Horoscope Today 10 December 2023 : तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
Libra Horoscope Today 10 December 2023 : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला आहे. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल अधिक आनंदी असेल. आज तुम्ही जर बाहेर जाणार असाल तर थोडं सावध राहावं लागेल. अन्यथा काही दुर्घटना घडू शकते. तुम्हाला दुखापत देखील होऊ शकते. लांबच्या प्रवासामुळे तुम्ही जवळच्या लोकांपासून दूर जाऊ शकता. त्यामुळे तुमच्या नात्यात दरार येऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळू शकते.
आज तुम्ही गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करा आणि देवाचे पठण करा. तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला सर्व सुखसोयी मिळतील आणि तुमचे मन खूप आनंदी होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या बाजूनेही तुम्ही समाधानी असाल. तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल खूप आनंदी असाल. तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल काही चांगली बातमी मिळू शकेल. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी चांगला काळ चालू आहे. तुमची प्रगती साधता येईल. आज तुमच्या कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीतून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील, त्यामुळे तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर फेडू शकता.
आजचे तूळ राशीचे आरोग्य
आज तुम्हाला छातीत दुखण्याची तक्रार भासू शकते. हृदयरोगींनी कोणत्याही प्रकारच्या औषधाबाबत निष्काळजीपणा करु नये. औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका.
तूळ राशीसाठी आजचे उपाय
उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा आणि त्या पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्पण करा.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: