Leo Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा थोडा आव्हानात्मक असेल, आठवड्याच्या पहिल्या भागात तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. तुम्ही सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात तुम्हाला थोडी दुखापत होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)


नवीन आठवड्यात तुम्हाला लव्ह लाईफ नकोशी वाटेल, तुमची डोकेदुखी वाढेल. तुम्ही जोडीदारासोबतचे वाद लवकरात लवकर सोडवले पाहिजे. काहीजणांना त्यांच्या जोडीदाराला खुश ठेवावं लागेल, तु्म्हाला त्यांचे लाड करावे लागतील. तुमच्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा. जे विवाहित आहेत त्यांनी आधीच्या प्रियकराशी संबंध ठेवू नये, अन्यथा समस्या वाढू शकतात. विवाहितांनी ऑफिसमध्ये लफडी करणं टाळावं, अन्यथा अडचणीत सापडू शकता.


सिंह राशीचे करिअर  (Leo Career Horoscope)


नोकरदारांनी काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतील. राजकारणी, चित्रकार, लेखक, आचारी आणि वकील यांचं कौतुक होईल, तर बँकर्स आणि अकाऊंटंट कामानिमित्त स्थलांतरित होऊ शकतात. जे नोकरी बदलण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी जॉब पोर्टलवर आपला प्रोफाईल अपडेट करावा, एक-दोन दिवसांत तुम्हाला अनेक ठिकाणांहून मुलाखतीसाठी फोन येतील. काही व्यावसायिकांना परवान्याशी संबंधित समस्या उद्भवत असतील, तर त्यांनी लवकरात लवकर सोडवाव्या. 


सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)


आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायद्याचं राहील, अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. जे लोक परदेशात सुट्टीची योजना आखत आहेत ते फ्लाइट आणि हॉटेल दोन्ही बुक करू शकतात. उद्योजकांना त्यांचा व्यवसाय पुढील स्तरावर नेण्याच्या चांगल्या संधी मिळतील. काही भाग्यवान व्यावसायिकांना आठवड्याच्या अखेरदी बलाढ्य नफा मिळेल.


सिंह राशीचे आरोग्य  (Leo Health Horoscope)


या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. ज्येष्ठ नागरिकांनी जिने चढताना किंवा बस किंवा ट्रेनमध्ये चढताना काळजी घ्यावी. काही महिलांना स्त्रीरोगविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक असेल. तुम्ही योग आणि ध्यानासाठी वेळ काढावा. सकाळी योगासनं आणि थोडा हलका व्यायाम करणं खूप फायदेशीर ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या