Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मार्चचा शेवटचा आठवडा (Weekly Horoscope 24 To 30 March 2024) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.


तूळ रास (Libra)


तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला लांबच्या प्रवासाला जातील. या काळात तुमच्या मनात चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही सकारात्मक राहाल. आठवड्याच्या मध्यात कामावर भावनिक निर्णय घेणं टाळा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचं उत्पन्न वाढेल. काहीतरी नवीन करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील, पण भांडण होण्याचीही शक्यता आहे.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. या आठवड्यात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. आठवड्याच्या मध्यात नशीब तुम्हाला साथ देईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी कामात काही बदल होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून सहकार्य मिळेल. आपल्या भावना आपल्या वडिलांसमोर व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात घरात लाईटिंगचं काम करता येईल. कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. ऑफिसमध्ये भांडणं टाळा.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीचे लोकांसाठी नवीन आठवडा शुभ ठरेल. व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात त्यांना यशही मिळेल. काही नवीन संपर्क बनवल्याचा फायदा तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवनातही तुम्ही एकमेकांना साथ द्याल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही काही सिक्रेट स्ट्रॅटेजी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात मदत होईल. तब्येत कमजोर होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक एखादे काम पूर्ण झालं तर तुम्ही आनंदी व्हाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला भावांची साथ मिळेल.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. खर्च जास्त होईल, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भावूक व्हाल, तुम्हाला त्यांचं प्रेम जाणवेल आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मोठे निर्णय घेणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला लव्ह लाईफमध्ये व्यस्त राहतील. तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल. तो तुम्हाला त्याच्या मनातील सर्व काही सांगू शकेल आणि तुमचं ट्यूनिंग चांगलं होईल. तुमचं उत्पन्नही चांगलं राहील. नोकरी बदलण्याचा विचार तुमच्या मनात येईल. नोकरदारांना आर्थिक लाभ होईल, खर्चात थोडी वाढ होईल. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले असतील, परंतु व्यवसायात तुमचा कोणाशी वाद होऊ शकतो, कारण तुमचा ट्यूनिंग त्यांच्याशी जुळणार नाही.


मीन रास (Pisces)


मीन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबाला पूर्ण वेळ देतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवावासा वाटेल आणि तुम्ही तसंच कराल. यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल, परस्पर तणाव दूर होतील. नोकरीवरही तुमचं लक्ष राहील. आठवड्याच्या मध्यात मुलांकडून आनंद मिळेल, त्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम कराल. लव्ह लाईफसाठीही हा काळ रोमँटिक असेल. तुमचं उत्पन्नही वाढेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत आरोग्य कमजोर राहील आणि खर्च वाढेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Weekly Horoscope 24 To 30 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या