Leo Weekly Horoscope 12 To 18 August 2024 : ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. या काळात नोकरी-व्यवसायातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांसाठीही हा आठवडा उत्तम राहील, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत तुमचं काम चांगलं राहील, वरिष्ठांकडून कौतुक होईल. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीचं लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)
तुमच्या नात्यात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे अनेक वैचारिक मतभेद होतील. पण, याचा जास्त विचार न करता तुमचा दिवस कसा चांगला जाईल याकडे तुम्ही लक्ष द्याल. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर बसून चांगला वेळ घालवा. एकमेकांच्या भावना शेअर करा. ज्या विवाहित तरूण महिला आहेत त्यांनी आपल्या सासरच्या मंडळींची योग्य काळजी घ्यावी. याचा परिणाम तुमच्या नात्यावर देखील दिसून येईल.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमचा आठवडा हा पूर्ण उत्पादकतेचा असणार आहे. काही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. विशेषत: ज्या गोष्टींमध्ये मशीनचा समावेश आहे अशा गोष्टींमध्ये जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच, तुम्हाला नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. हेल्थकेअर, बॅंकिंग, आयटी आणि आर्किटेक्चर संबंधित प्रोफेशनमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन तुम्ही तुमच्या कार्याची सुरुवात करू शकता.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
या आठवड्यात तुम्ही पैशांच्या बाबतीत जास्त व्यावहारिक आणि चाणाक्ष असणं गरजेचं आहे. तसेच, या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या गोष्टीत पैसे गुंतवण्याची इच्छा होऊ शकते. पण, काही काळासाठी तुमचा हा विचार बाजूला ठेवा. तसेच, तुमच्या बचतीचा योग्य पद्धतीने वापर करायला शिका.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
ज्या लोकांना हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सुट्टीच्या दिवसांत जास्त काळजी घ्या. तसेच, सकाळच्या वेळेत योग आणि हलका व्यायाम करत राहा. तुमच्या शरीरासाठी तो फार चांगला आहे. बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: