Travel : आजकाल कामाचा ताण, बदलती जीवनशैली, व्यस्त कामामुळे अनेकांना मनमोकळं जगता येत नाही, कामाच्या तणावात अनेकांना आपल्या कुटुंबाला वेळही देता येत नाही, यामुळे आपण स्वत:ला कुठेतरी हरवून बसल्याची जाणीव होऊ लागते. जर तुम्ही ऑफिस आणि घर, घर ते ऑफिसच्या धावपळीने कंटाळले असाल, तर काही दिवस विश्रांती घेऊन तुमचे शरीर आणि मन रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर प्रवासापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. या विश्रांतीसाठी, अशा ठिकाणी जाण्याची प्लॅन करा, जे केवळ शांत आणि सुंदर नाही तर तुम्ही तेथे जाऊन डिजिटल डिटॉक्सिफिकेशन देखील करू शकता, जे आजच्या काळात खूप महत्वाचे झाले आहे.
डिजिटल डिटॉक्सिफिकेशनसाठी भारतातील उत्तम ठिकाणं
ऑफिसमध्ये काम करण्याची आणि नंतर फोनवर व्यस्त राहण्याची सवय माणसाला आळशी बनवते. त्याचे व्यसन शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप वाईट आहे. यातून ब्रेक घेण्याचा विचार करत असाल तर बाहेर फिरायला जा. चालणं ही एक चांगली थेरपी आहे. डिजिटल डिटॉक्सिफिकेशनचा हा एक उत्तम मार्ग आहे. आजकाल फोनपासून दूर राहणे कठीण झाले आहे, ज्यामुळे फोनचे व्यसनच लागत चालले आहे. बदलती जीवनशैली आणि त्यामुळे होणारे आजार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सण जवळ आले आहेत, या दरम्यान एक लांब वीकेंड बनतो, त्यामुळे व्यस्त कामातून स्वत:ला ब्रेक घेण्यासाठी तसेच डिजिटल डिटॉक्ससाठी यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते. भारतातील या सुंदर ठिकाणांना एकदा भेट द्या...
स्पिती व्हॅली (हिमाचल प्रदेश) - इथले दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल
हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीचे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. हिमाचलच्या इतर ठिकाणांप्रमाणे येथे गर्दी दिसत नाही. हे ठिकाण नीट पाहण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस लागतात. स्वच्छ निळे आकाश, पांढरेशुभ्र स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, शांत वातावरण, सुंदर मठ तुमची सहल अविस्मरणीय बनवेल. येथे आल्यानंतर तुमचे मन नक्कीच रिफ्रेश होईल.
अंदमान - गर्दी नसलेले नितळ समुद्रकिनारे
अंदमानचे समुद्र किनारे अतिशय स्वच्छ आहेत आणि गोव्यासारखी गर्दी नाही. काही दिवस शांततेत घालवण्यासाठीही हे ठिकाण उत्तम आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या अंदमानला भेट देण्याचा निर्णय हा जीवनातील सर्वोत्तम निर्णय ठरेल.
गोकर्ण (कर्नाटक) - एक वेगळीच शांतता मिळते
कर्नाटकात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही खूप निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता, परंतु जर तुम्ही तुमचे मन आराम आणि रिफ्रेश होण्याचा विचार करत असाल तर गोकर्णला जाण्याचा प्लॅन करा. गोकर्ण समुद्रकिनारी बसून एक वेगळीच शांतता मिळते. येथे आजूबाजूला अनेक ठिकाणे आहेत, जी तुम्ही दोन ते चार दिवसांच्या सुट्टीत फिरू शकता.
हेही वाचा>>>
Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळा..खंडाळा तर नेहमीचच...पण गडचिरोलीतील 'ही' अद्भुत ठिकाणं फिरण्याची एक वेगळीच मजा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )