Leo Horoscope Today 29 January 2023 : आज 29 जानेवारी 2023 सिंह (Leo) राशीच्या लोकांसाठी धनाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ परिणाम देणारा आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा होईल. तुमचे यश पाहून आजूबाजूचे लोक तुमचा हेवा करतील. फक्त तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस लाभदायक आहे. गुंतवणुकीमुळे फायदा होईल आणि पैशाच्या बाबतीत आज तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळेल. राशीभविष्य जाणून घ्या



आजचा दिवस कसा जाईल?
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाच्या बाबतीत चांगला आहे. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी काळजीपूर्वक काम करावे, अन्यथा काही चूक होऊ शकते. आज तुम्हाला चांगल्या संधी मिळत आहेत. मात्र आज तुम्हाला कामाचा ताण जाणवेल. कार्यालयात कठीण दिवस असू शकतो आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी फायदा होईल. व्यवसायात भागीदारासोबतही परस्पर व्यवहार काळजीपूर्वक करा.



सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
तुमचा कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमच्यासाठी प्रेम आणि रोमान्सचा दिवस आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद मिळेल. आज तुमच्या घरात एखाद्या सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहील.



आज नशीब 97% तुमच्या बाजूने 
सिंह राशीच्या लोकांचा आज स्वतःवर आत्मविश्वास असेल आणि तुम्ही तुमची कार्य क्षमता मजबूत करण्यासाठी मोठा विचार कराल. उत्पन्नही ठीक राहील आणि खर्च मर्यादित राहील. विवाहित लोकांच्या जीवनात कोणतीही गोष्ट तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. जे लोक प्रेम जीवनात आहेत, त्यांना जोडीदाराबद्दल काही शंका असू शकतात. हे प्रकरण परस्पर चर्चेने सोडवले तर बरे होईल. नोकरदार लोकांना कार्यालयात त्यांचे काम दाखवण्याची संधी मिळेल आणि त्यांचे कौतुकही होईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने असेल. घराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा.



सिंह राशीचे आरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला पोटाचा आणि डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. खाण्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.


शुभ रंग - निळा
शुभ क्रमांक - 5


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Gemini Horoscope Today 29 January 2023 : मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावपूर्ण असेल, राशीभविष्य जाणून घ्या