Gemini Horoscope Today 29 January 2023 : मिथुन (Gemini) राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण असेल. आज एखादे काम पूर्ण करण्यात तुमची बरीच मेहनत खर्ची पडेल. आज ऑफिसमध्ये तुम्हाला एखादे कठीण काम पूर्ण करण्यास सांगितले जाईल. तसेच कार्यालयात तणावाचे वातावरण राहील. आज मिथुन राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती फारशी शुभ नाही. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पैशाशी संबंधित समस्या असू शकतातप्रत्येक बाबतीत आपल्या बाजूने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य


 


आजचा दिवस कसा असेल?


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल आणि तुमच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल. सुख-सुविधा वाढल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरदार लोकांना इच्छित नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते.



मिथुन राशीचे कौटुंबिक जीवन
आज घरातील वातावरण खूप चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच तुमचे लव्ह लाईफही आज खूप चांगले असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.



आज मिथुन राशीचे आरोग्य
आज तुम्हाला चक्कर येण्याची समस्या असू शकते. किंवा पचनाच्या समस्या जाणवतील. पोटाची काळजी घ्या आणि आवश्यकतेपेक्षा थोडे कमी खा.



आज नशीब 65% तुमच्या बाजूने 
मिथुन राशीच्या लोकांनी आज कोणत्याही प्रकारच्या प्रवासाला जाणे टाळावे. आजची दुपार आपल्या कुटुंबासोबत घालवाल. घरातील मुलांच्या गरजा समजतील. कामाच्या ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी कठोर परिश्रमावर अवलंबून राहावे लागेल. आळशीपणा सोडून द्यावा लागेल. विवाहित लोकांचे जीवन सामान्य असेल, प्रेमाने भरलेले संवाद असतील. एकमेकांवर विश्वास असेल. लव्ह लाईफच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल आणि नात्यात रोमांस वाढेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. सूर्याला जल अर्पण करा आणि सूर्य चालिसाचा पाठ करा.



मिथुन राशीसाठी आजचे उपाय
मिथुन राशीच्या लोकांनी आज तुळशीच्या समोर दिवा लावावा. तुळशीच्या मातीने टिळा लावावा.



शुभ रंग - पिवळा
शुभ क्रमांक - 9


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Taurus Horoscope Today 29 January 2023 : वृषभ राशीच्या लोकांसाठी आज यशाचा दिवस, नशीब साथ देईल, राशीभविष्य जाणून घ्या