Leo Horoscope Today 12th March 2023 : नोकरीची नवीन संधी, कुटुंबातही आनंदाचं वातावरण; सिंह राशीचा 'असा' आहे आजचा दिवस
Leo Horoscope Today 12th March 2023 : आज तुम्हाला मन आणि बुद्धीने विचार करून काही योजना आखाव्या लागतील.
Leo Horoscope Today 12th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. नोकरदार लोकांना आज त्यांच्या कामात नवीन अधिकारी भेटू शकतात, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफरदेखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल.
कुटुंबात आनंदी वातावरण राहील
आज तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये दुसऱ्या व्यक्तीमुळे तणाव येऊ शकतो. पण जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं नातं निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात पाहुण्यांच्या आगमनाने घरातील सर्व मंडळी खुश राहतील. कामाच्या संदर्भात, आज तुमच्यावर जबाबदारीचे ओझे वाढू शकते.
गोड वाणीचा वापर करा
आज तुम्हाला मन आणि बुद्धीने विचार करून काही योजना आखाव्या लागतील. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे आणि तुम्हाला नशीबाचीही साथ आहे. त्यामुळे गोड वाणीचा वापर करा. तसेच, राजकीय क्षेत्रात उत्साह वाटेल. धार्मिक गोष्टींसाठी पैसे खर्च करू शकता.
आजचे सिंह राशीचे आरोग्य :
आज सिंह राशीचे आरोग्य फारसे चांगले नसणार आहे. डोकेदुखी किंवा तुम्हाला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी औषधांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका.
सिंह राशीसाठी आजचे उपाय :
आजच्या दिवशी सिंह राशीसाठी हनुमानाचे पठण करणं फायदेशीर ठरेल. देवाचे ध्यान करून गायत्री मंत्राचा 11 वेळा मनात जप करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :