Leo Horoscope Today 11 June 2023 : अनावश्यक वाद टाळा, कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या; सिंह राशीसाठी महत्त्वाचा सल्ला
Leo Horoscope Today 11 June 2023 : सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल.
Leo Horoscope Today 11 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत उपलब्ध होतील. आज घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून पैसे कसे वाचवायचे याबद्दल तुम्हाला शिकवले जाईल, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. आध्यात्मिक जीवनासाठी तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आज घरातील एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू तुटल्यामुळे तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित नवीन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मोकळ्या वेळेचा योग्य वापर करायला शिका. अन्यथा, तुमचे प्रतिस्पर्धी पुढे निघून जातील. गरजेच्या वेळी तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुमचा आदर वाढेल.
प्रयत्नांना यश मिळणार
सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहेत.
नोकरदार वर्गाला कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात आज वाढ होईल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.
आजचे सिंह राशीचे आरोग्य
आज सिंह राशीचे आरोग्य चांगले राहील. पण, कामाच्या ताणामुळे काही काळ विश्रांती घ्यावीशी वाटेल.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
उद्या उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यानंतर दिवा लावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :