Kumbh Mela 2025: हिंदू सनातन धर्मात साधू-संतांचे विशेष महत्त्व आहे. आपल्या जीवनात भक्ती आणि साधना करून ते लोकांना भगवंताच्या भक्तीचा मार्ग अवलंबण्याची प्रेरणाही देतात. ऋषी आणि संतांमध्ये नागा साधू विशेष आहेत. त्यांचे जीवन कठोर तपश्चर्या आणि नियमांनी भरलेले आहे. नागा साधू बनण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानली जाते. अशा परिस्थितीत नागा साधू बनण्याचे नियम आणि त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
नागा साधू बनण्याची कठीण प्रक्रिया
नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे आणि त्यासाठी आखाड्यांची परवानगी आवश्यक आहे. ती व्यक्ती साधू बनण्यास पात्र आहे की नाही, याचे आखाडा समितीकडून मूल्यांकन केले जाते. आखाडा समितीने ती व्यक्ती पात्र ठरल्यास त्याला आखाड्यात प्रवेश दिला जातो. यानंतर त्याला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते. नागा साधू बनण्यासाठी, ब्रह्मचर्य नियमाचे पालन करणे खूप महत्वाचे आहे, ज्यास 6 महिने ते 1 वर्ष लागू शकतात. या दरम्यान साधकाला पाच गुरूंकडून शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश अशा पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते.
स्वतःचे पिंड दान आणि श्राद्ध
यानंतर ती व्यक्ती आपले सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते. नागा साधू बनल्यानंतर, साधक स्वतःला पिंड दान करतो, जे त्याचे प्रतीक आहे की त्याने आपले जुने जीवन पूर्णपणे सोडून दिले आहे. नागा साधू भिक्षेत दिलेले अन्न ग्रहण करतात आणि त्यांना अन्न मिळाले नाही तर ते उपाशी राहतात.
नागा साधू कपडे घालत नाही..
नागा साधू सामान्य कपडे घालत नाहीत, कारण ते त्याला दिखाऊपणा आणि संसाराचे प्रतीक मानतात. ते आपले शरीर राखेने झाकतात. नागा साधू झोपण्यासाठी पलंगाचा वापरही करत नाहीत. त्यांच्या जीवनात साधेपणा आणि कठोरपणाला विशेष स्थान आहे. नागा साधू समाजातील सामान्य लोकांपुढे झुकत नाहीत किंवा कोणाची निंदाही करत नाहीत. तथापि, ते ज्येष्ठ भिक्षूंकडून आशीर्वाद घेण्यासाठी आपले मस्तक टेकतात. या सर्व नियमांचे पालन करणारी व्यक्ती नागा साधू बनण्यास पात्र आहे.
कधीपासून सुरू होणार कुंभमेळा?
हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अत्यंत महत्त्व आहे. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे दर 12 वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. मात्र, प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणारा महाकुंभ हा सर्वात भव्य मानला जातो. जगातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होईल. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाला खूप महत्त्व आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यंदा पौष पौर्णिमा सोमवार, 13 जानेवारी रोजी पहाटे 5:03 पासून सुरू होईल आणि मंगळवारी, 14 जानेवारी रोजी दुपारी 3:56 पर्यंत सुरू राहील. सनातन धर्मात सूर्योदयापासून तिथीची गणना केली जाते, म्हणून पौष पौर्णिमा हा सण सोमवार, 13 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.
हेही वाचा>>>
पुरुषांप्रमाणे महिला नागा साधू खरंच विवस्त्र जीवन जगतात? अनेक कठीण परीक्षा, तप अन् नियम.. एक धक्कादायक वास्तव
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )