Janmashtami 2022 : जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी भाविक श्रीकृष्णाच्या  पालखीला पूर्ण भक्तिभावाने सजवतात. या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय देखील करतात. वास्तुशास्त्रामध्ये श्रीकृष्णाशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते. वास्तूनुसार जन्माष्टमीच्या दिवशी मोराची पिसे घरात आणल्याने सर्व वास्तुदोष दूर होतात. चला जाणून घेऊया या दिवशी घरात मोराची पिसे आणण्याचे कोणते फायदे होतात आणि ते कसे लावावे.


मोराच्या पिसामुळे वास्तुदोष दूर होतात


वास्तूमध्ये मोराच्या पिसाला सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरात मोराची पिसे आणल्याने सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच, शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात. घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराची पिसे लावल्याने ते घर खराब होत नाही. त्याच्या प्रभावामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते. 


मोराची पिसे अशी ठेवा


वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे घरात ठेवण्यासाठीही नियम बनवले आहेत. वास्तूनुसार 8 मोराची पिसे घ्या आणि ती सर्व पांढऱ्या धाग्याने बांधा. ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करताना ही मोराची पिसे घरात कुठेतरी स्वच्छ ठिकाणी ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतील आणि सुख-समृद्धी नांदेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Janmashtami 2022 Shubh Yog: कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी 4 ग्रह बनवत आहेत दुर्मिळ योग, जाणून घ्या याचे महत्त्व


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या