Janmashtami 2022 Shubh Yog : यंदा अष्टमी तिथी दोन दिवसांची असल्याने जन्माष्टमी 18 ऑगस्टला साजरी करावी की नाही, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की भगवान श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला होता. त्यामुळे जन्माष्टमी 18 ऑगस्ट रोजी साजरी करावी. जर तुम्ही 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी करणार असाल तर या दिवशी 2 दुर्मिळ योग तयार होत आहेत. अशा दुर्मिळ योगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व कार्य विना अडथळा पूर्ण होतात.


या दिवशी हा शुभ योग तयार होत आहे


धार्मिक मान्यतेनुसर, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्माच्या वेळी रोहिणी नक्षत्र होते. पंचांगानुसार, यावेळी अष्टमी तिथी गुरुवार, 18 ऑगस्टच्या रात्री 09:21 पासून सुरू होईल आणि शुक्रवार, 19 ऑगस्ट रोजी रात्री 11.00 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत काही लोक 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा उपवास आणि पूजा करतील. पंचांगानुसार 18 ऑगस्टला वृद्धी योग आणि ध्रुव योग हे दोन अतिशय शुभ योगही तयार होत आहेत. अशा स्थितीत या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व वाढले आहे.


होईल पुण्य लाभ 


पंचांगानुसार 17 ऑगस्ट रोजी रात्री 8.57 वाजून 57 मिनिटांनी वृद्धी योग सुरू होत असून हा वृद्धी योग 18 ऑगस्टच्या रात्री 8.42 पर्यंत आहे. दुसरीकडे, दुसरा शुभ योग - ध्रुव योग 18 ऑगस्ट रोजी रात्री 8:41 पासून सुरू होईल आणि 19 ऑगस्ट रोजी रात्री 8:59 पर्यंत राहील. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार हे दोन्ही शुभ योग राधा-कृष्णाच्या पूजेसाठी अतिशय शुभ आहेत. या योगात केलेल्या उपासनेमुळे अक्षय पुण्य लाभ होतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ