Krishna Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज अनेक ठिकाणी जन्माष्टमी साजरी केली जात असली तरी, बहुतांश ठिकाणी 19 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करण्यात येणार आहे. मथुरेतही 19 ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. पुराणात भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रंजक कथांचा उल्लेख आहे. त्यांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या अनेक आश्चर्यकारक घटनांबद्दल बहुतेकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का कृष्णाला त्यांचे जन्मस्थान मथुरा का सोडावे लागले? जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर या रंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.


कृष्णाला फार प्रिय होती त्यांची 'जन्मनगरी' 
भगवान श्रीकृष्णाचे त्यांची जन्मनगरी मथुरेवर खूप प्रेम होते. त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन, नांदगाव, बरसाणा आदी ठिकाणी गेले. क्रूर मामा कंसाचा वध केल्यानंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांना तुरुंगातून मुक्त केले. जनतेच्या विनंतीवरून कृष्णाने मथुरेचे संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात घेतले. तिथल्या लोकांनाही कंसासारख्या क्रूर शासकापासून स्वातंत्र्य हवे होते, पण ते इतके सोपे नव्हते. कंसाचा वध केल्यानंतर त्याचा सासरे जरासंध कृष्णाचे कट्टर शत्रू झाले. क्रूर जरासंध मगधचा अधिपती होता. हरिवंश पुराणानुसार जरासंधाला आपले साम्राज्य वाढवायचे होते. यासाठी त्याने अनेक राजांना पराभूत करून त्यांन मारले होते. कंसाचा मृत्यू झाल्यानंतर जरासंधाला कृष्णाकडून सूड घ्यायचा आणि मथुरा काबीज करायचे होते.


जरासंधाने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला
पुराणानुसार, जरासंधाने 18 वेळा मथुरेवर हल्ला केला, ज्यामध्ये तो 17 वेळा अयशस्वी झाला. शेवटच्या वेळी जरासंधाने या हल्ल्यासाठी एक शक्तिशाली शासक कालयवन यालाही आपल्यासोबत घेतले. मात्र कालयवन युद्धात मारला गेला, त्यानंतर त्याच्या देशातील लोक कृष्णाचे शत्रू झाले. या वारंवार होणाऱ्या युद्धामुळे मथुरेतील सामान्य जनताही त्रस्त झाली होती. शहरातील सुरक्षा भिंतीही हळूहळू कमकुवत होत होत्या. शेवटी कृष्णाने सर्व रहिवाशांसह मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला. कृष्णाने याबाबत असे सांगितले की, ते युद्धातून पळून जाणार नाही, परंतु त्यांनी ठरविलेल्या आणि निवडलेल्या जागेनुसारच लढणार.



कृष्णाने केली द्वारका शहराची स्थापना
मथुरेतील सर्व लोकांसह कृष्ण गुजरातच्या किनार्‍यावर आले. येथे त्यांनी आपले भव्य द्वारका शहर नव्याने वसविले. लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी संपूर्ण शहराला चारही बाजूंनी मजबूत तटबंदी केली. पुराणानुसार श्रीकृष्णाने येथे 36 वर्षे राज्य केले.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Janmashtami 2022 Shubh Yog: कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी 4 ग्रह बनवत आहेत दुर्मिळ योग, जाणून घ्या याचे महत्त्व


Janmashtami 2022 : जन्माष्टमीला कृष्णाला अर्पण करा 56 प्रकारचे नैवेद्य, कशी सुरू झाली परंपरा?


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ