Kojagiri Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्याच दिवशीच कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2024) साजरी केली जाते. हिंदू धर्मात हा दिवस फार महत्त्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तसेच खीर बनवण्याची परंपरा आहे. तसेच, आजच्या दिवशी काही शुभ गोष्टींचं दान करणं अशुभ मानलं जातं. 


कोजागिरी पौर्णिमेला काय दान करु नये?


कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान, स्नान करणं फार शुभ मानलं जातं. ज्योतिष शास्त्रात, अशा काही गोष्टींचं वर्णन करण्यात आलं आहे की, ज्या गोष्टी आपण कधीच कोणालाही दान करु नयेत. हे एक प्रकारे अशुभतेचं लक्षण आहे. यामुळे घरात एकामागोमाग संकटं येऊ लागतात. 


लोखंडाचं सामान


आजच्या दिवशी चुकूनही लोखंडाचं सामान कोणाला दान करु नका. एखाद्याला लोखंड दान करणं शुभ मानलं जात नाही. मान्यतेनुसार, लोखंडाचं दान केल्याने शनीदोष लागतो. त्याचबरोबर आयुष्यात तुम्हाला अनेक संकटांचा, आव्हानांचा सामना करावा लागतो. 


दही 


तसेच, आजच्या दिवशी चुकूनही कोणाला दही दान करु नये. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातून सुख-शांती निघून जाऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार मानल्यास यामुळे तुम्हाला शुक्रदोषही लागण्याची शक्यता आहे. 


मीठ 


आजच्या दिवशी एखाद्याला मीठाचा खडा किंवा मीठ दान करणं फार अशुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मकता येऊ लागते. तसेच, तुम्ही या काळात कोणतंही नवीन काम सुरु करु शकत नाहीत. 


कोणत्या गोष्टी दान करणं शुभ?


धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, गूळ, खीर यांचं दान करणं शुभ मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर यामुळे तुमची आर्थिक तंगीपासून सुटका होऊ शकते. तसेच, तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. 


कोजागिरी पौर्णिमा 2024 तिथी 


वैदिक पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात आज रात्रीपासून 08 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. तर, याची समाप्ती पुढच्या दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबरच्या दिवशी संध्याकाळी 04 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Shani Dev : 10, 20 नाही तर तब्बल 500 वर्षांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शनी आणि गुरुची उलटी चाल; 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'