Kartik Purnima 2024 : हिंदू सनातन धर्मात कार्तिक पौर्णिमेला (Kartik Purnima) विशेष महत्त्व आहे. उत्तर भारतात पौर्णिमेच्या तिथीला कार्तिक पौर्णिमेचं स्नान केलं जातं. त्यानुसार, आज संपूर्ण देशभरात लोक पवित्र गंगासारख्या नदीच्या ठिकाणी स्नान करतायत. तसेच पुण्य दान करत आहेत. 


कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे स्नानाला विशेष महत्त्व आहे. त्याप्रमाणेच संध्याकाळच्या वेळी काही उपाय देखील करणं गरजेचं आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे हे अचूक उपाय कोणते ते जाणून घेऊयात. 



  • ज्योतिष शास्त्रानुसार, आज शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आपल्याला माहीत आहे की, पिंपळाच्या  झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे स्नान केल्यानंतर या झाडावर दूध किंवा जल अर्पण करा. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर तुपाचा दिवा ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 


  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करा. तसेच, तुळशीला शेंदूर आणि ओढणी अर्पण करा.




  •  या दिवशी तुमचं घर सुंदर रांगोळीने सजवा. तसेच, तुमच्या कुल दैवतांना खीर किंवा गोडाचे पदार्थ अर्पण करावेत. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 



  • याशिवाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच, गाईची सेवी करावी. असं म्हणतात की, या दिवशी सर्व देव-देवता उत्सव साजरा करतात. त्यामुळे हा अत्यंत शुभ दिवस आहे. 

  • या दिवशी पुण्य दानाला देखील विशेष महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथात म्हटल्याप्रमाणे या दिवशी दूध. दही , तूप , साखर, तांदूळयांसारख्या गोष्टी दान कराव्यात यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. आणि तुमच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील. 

  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक तुपाचा दिवा लावावा. घराचा उत्त्र किंवा पूर्व कोपऱ्यासे, तुमच्या व्यवसायातही प्रगती पाहायला मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                    


Shani Margi : आज संध्याकाळी ठीक 7 वाजता शनीची मार्गी चाल; मेष ते मीन सर्व 12 राशींवर कसा होणार परिणाम?