Shani Margi : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज शनीची (Lord Shani) मार्गी चाल होणार आहे. आज संध्याकाळी ठिक 7 वाजून 51 मिनिटांनी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. त्यामुळे शनीच्या मार्गी चालीचा परिणाम सर्व 12 राशींवर (Zodiac Signs) नेमका कसा होणार ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या मार्गी चालीमुळे मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. तसेच, यामुळे वृद्धी योग जुळून आला आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याबाबत सतर्क राहा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. आज तुम्हाला जमिनीच्या संदर्भात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेलं तुमचं काम पूर्ण होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं मार्गी होणं आरोग्यासाठी लाभदायक ठरु शकतं. या काळात तुमची दीर्घकालीन आजारापासून सुटका होईल. तसेच, तीर्थयात्रेला जाण्याचा शुभ योग आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल नसणार आहे. जोपर्यंत शनी कुंभ राशीत विराजमान आहे या राशीवर अनेक संकटं कोसळतील. जोपर्यंत शनी मीन राशीत प्रवेश करत नाही तोपर्यंत हा काळ कठीण असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानांचा ठरण्याची शक्यता आहे. या काळात कोणतंही शुभ कार्य हाती घेऊ नका. अन्यथा तुम्हाला त्यात नुकसान भोगावं लागू शकतं. तसेच, विद्यार्थ्यांना देखील अभ्यासात फारसं यश मिळणार नाही.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनी मार्गीचा काळ फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या दूर होतील. तसेच, विद्यार्थ्यांच्या संदर्भात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
शनीचं मार्गी होणं तूळ राशीच्या लोकांसाठी भाग्याचं ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रॉपर्टीच्या संदर्भात अनेक शुभ संकेत मिळतील. तसेच, पैशांच्या बाबतीत तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये मानसिक ताणाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला नफ्याच्या जागी तोटाच जाणवेल. कोणतीही जोखीम या काळात घेऊ नका.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना शनी मार्गीच्या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण संकटाचं ठरण्याची शक्यता असू शकते. या काळात तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसळण्याची शक्यता आहे. तुमचे अनेकांबरोबर वादविवाद होऊ शकतात. यासाठी तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावं.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमची वैवाहिक स्थिती चांगली असल्या कारणाने जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला बॉन्ड शेअर कराल. एकमेकांची मदत कराल. तुम्ही ठरवलेली काे निश्चित वेळेत पूर्ण होतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या मेहनतीला यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :