Kamada Ekadashi 2024 : हिंदू नवीन वर्षाची सुरुवात 9 एप्रिल 2024 पासून सुरु झाली आहे. या नवीन वर्षात अनेक सण, समारंभ, व्रत वैकल्ये, उपवास केले जाणार आहेत. यापैकीच एक म्हणजे एकादशी (Ekadashi). चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी (kamada Ekadashi) म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून 2 वेळा आणि वर्षातून 24 वेळा येते. यावेळी कामदा एकादशी शुक्रवार, 19 एप्रिल रोजी म्हणजेच (आज) साजरी केली जाणार आहे.
कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. कामदा एकादशीला योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व दु:ख आणि संकटांपासून मुक्ती मिळवता येते.याबरोबरच सुख, शांती, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते असं म्हटलं जातं.
कामदा एकादशी शुभ मुहूर्त (Kamada Ekadashi 2024 Muhurth)
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 05:31 वाजता सुरू होईल आणि 19 एप्रिल रोजी रात्री 08:04 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार १९ एप्रिल रोजी कामदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
कामदा एकादशी 2024 तारीख (Kamada Ekadashi 2024 Date)
चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशी यंदा 19 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी श्री हरीची उपासना आणि उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
कामदा एकादशी प्रारंभ आणि समाप्ती वेळ (Kamada Ekadashi 2024 Time)
हिंदू पंचांगानुसार,चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात आज म्हणजेच गुरुवार 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार 19 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजून 4 मिनिटांनी समाप्त होईल.तर, एकादशीच्या पूजेची वेळ-सकाळी 5 वाजून 51 मिनिटं ते 10 वाजून 43 मिनिटं आहे.
कामदा एकादशीचा शुभ योग (Kamada Ekadashi 2024 Shubh Yog)
कामदा एकादशीच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवि योग सकाळी 5 वाजून 51 मिनिटे ते 10 वाजून 57 मिनिटापर्यंत आहे. तर वृद्धी योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सकाळी 1.45 पर्यंत राहील, त्यानंतर ध्रुव योग असेल. कामदा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी 10:57 पर्यंत राहील, त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: