Priyanka Chopra :  अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूड असा सिनेप्रवास केला आहे. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांका चोप्राही (Priyanka Chopra) आपल्या वर्किंग स्टाइलसाठीदेखील ओळखली जाते. सध्या प्रियांका ही हॉलिवूडपट 'हेड्स ऑफ स्टेट'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. 


प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिचा फॅन फॉलोईंगदेखील आहे. सोशल मीडियावर प्रियांका आपल्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या काही ना काही गोष्टी शेअर करत असते. त्याशिवाय प्रियांका आपल्या कामाबद्दल, नव्या प्रोजेक्टचीदेखील माहिती देत असते.






प्रियांकाला दुखापत


प्रियांकाने सोशल मीडियावर आपल्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. प्रियांकाने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले आहे. चित्रपटातील स्टंट दरम्यान ही दुखापत झाली असावी असे म्हटले जात आहे. 


प्रियांकाने शेअर केला फोटो


इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला आणि कपाळावर रक्त असल्याचे दिसत आहे. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे.




'हेड्स ऑफ स्टेट' हा ॲक्शन चित्रपट आहे. यामध्ये प्रियांका ही खतरनाक ॲक्शन सीन्स आणि स्टंट करताना दिसणार आहे. प्रियांका चोप्रा ही अनेकदा स्वतः स्टंट करते. अलीकडील  ‘सिटाडेल’ चित्रपटामधील 80  टक्के स्टंट तिने रिचर्ड मॅडनसह केले होते. DNA ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपण जवळपास 80 टक्के स्टंट केले असल्याचे कबुल केले होते.  


बॉलिवूडमध्ये कधी चित्रपट करणार?


प्रियांका चोप्रा ही हॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. तर, बॉलिवूडमधील काही चित्रपटांची निर्मिती ती करत आहे. फरहान अख्तर दिग्दर्शिक 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका ही कॅतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही नवीन अपडेट आली नाही. डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'टायगर' प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटाला तिने आवाज दिला आहे.