Chaitra Navratri 2024 Horoscope Today : ज्योतिष शास्त्रानुसार, आज, बुधवार, 17 एप्रिल हा महत्त्वाचा दिवस आहे. आज चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) नववा दिवस आहे. आज दुपारी 03:14 पर्यंत नवमी तिथी आणि नंतर दशमी तिथी असणार आहे. आज संपूर्ण दिवस आश्लेषा नक्षत्र राहणार आहे. त्यानुसार सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार नेमका कसा राहील ते जाणून घेऊयात.


मेष रास (Aries Horoscope Today)


व्यवसाय - कॉन्ट्रॅक्ट बिजनेसमध्ये तुमच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या कंपन्यांना याचा लाभ होईल. 


नोकरी - कामाच्या ठिकाणी तुमच्या गैरवर्तनामुळे तुमच्या बॉसकडून तुम्हाला चेतावणी दिली जाईल. 


कुटुंब - कुटुंबातील तुमचं अस्तित्व फार महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक मोठे निर्णय घेताना तुमचा सल्ला घेतला जाईल. 


आरोग्य - आज खाण्या-पिण्याच्या बाबतीत तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


व्यवसाय - व्यवसायात तुमची कामगिरी चांगली राहील. कामाच्या नवीन ऑर्डर्सही मिळतील. 


नोकरी - नोकरीत ज्युनिअर लोकांशी तुमची वर्तवणूक चांगली ठेवा. वाणीवर नियंत्रण ठेवा. 


विद्यार्थी - विद्यार्थ्यांसाठी तुमच्या करिअरचे नवीन मार्ग खुले होतील. 


आरोग्य - आज दुपारी तुम्हाला पोटदुखीच्या संदर्भात त्रास होऊ शकतो. 


मिथुन रस (Gemini Horoscope Today)


व्यवसाय - जे लोक वेब डिझायनिंग, अॅप डेव्हलपर आणि यूट्युब बिझनेसच्या क्षेत्रात आहे त्यांना चांगला नफा मिळणार आहे. 


नोकरी - नोकरीत तुमच्या बढतीची शक्यता नाकारता येत नाही. 


कुटुंब - ऑफिसची कामे करण्याबरोबरच तुम्ही कुटुंबिंयांकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. 


आरोग्य - आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही कुरघोडी सहन कराव्या लागतील. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


व्यवसाय - तुमच्या अपार मेहनतीमुळे तुमची चांगली प्रगती होईल. लवकरच धनलाभाच संकेत आहेत. 


नोकरी - नोकरदार वर्गाने आज कामाच्या बाबतीत सतर्कता दाखवावी. अनेक नवीन प्रोडेक्ट्सवर तुम्हाला काम करावं लागू शकतं. 


विद्यार्थी - जे विद्यार्थी काही विषयांच्या बाबतीत कमजोर आहेत त्यांनी त्या विषयावर जास्त भर घेणं गरजेचं आहे. 


आरोग्य - देवाच्या कृपेने आज तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत असणार आहे. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


व्यवसाय - आज औद्योगिक क्षेत्रात तुम्ही कामाच्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्यात अयशस्वी व्हाल. ज्यामुळे तुमचा व्यवसाय तोट्यात जाईल. 


नोकरी - आज अतिआत्मविश्वासामुळे तुमची अनेक कामे पूर्ण होणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहा. 


कुटुंब - कुटुंबात आज काहीसं तणावाचं वातावरण असू शकतं. तुम्ही समजुतीने निर्णय घेणं अपेक्षित आहे. 


आरोग्य - आज तुम्हाला अंगदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


व्यवसाय - शूल योग तयार झाल्याने तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. 


नोकरी - ज्यांना आपल्या आवडीचं रूपांतर व्यवसायात करायचं आहे अशा लोकांसाठी ही चांगली संधी आहे. 


कुटुंब - संध्याकाळचा वेळ कुटुंबियांबरोबर अतिशय चांगला आणि आनंदात जाईल. 


आरोग्य - पोटदुखीच्या त्रासाने तुम्ही हैराण असाल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


व्यवसाय - ऑनलाईन व्यवसायात नफा मिळाल्याने तुमची चिंता कमी होईल. नवीन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळेल. 


नोकरी - नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील.


कुटुंब - आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या वागणुकीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. 


आरोग्य - दात आणि तोंडाच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होईल. थंड, गरम आणि आंबट पदार्थांपासून दूर राहा. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


व्यवसाय - शूल योग तयार झाल्यामुळे, व्यवसायात नवीन प्रकल्प मिळून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 


नोकरी - कामाच्या बाबतीत तुमचा वेग वाढवण्याची गरज आहे. अन्यथा स्पर्धेत तुम्ही मागे राहू शकता. 


कुटुंब - कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवाल. इतर दिवसांपेक्षा तुमच्यासाठी दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात असलेले वाद मिटतील. 


आरोग्य - आज सांधेदुखीच्या त्रासाने तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल.  


धनु  रास (Sagittarius Horoscope Today)


व्यवसाय - बांधकाम व्यवसायातील नुकसान भरपाई न मिळाल्याने तुमची चिंता वाढेल. व्यापाऱ्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागेल, कारण बेजबाबदार वृत्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. 


नोकरी - नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात मानसिक चिंतेने होण्याची शक्यता आहे.ठाम राहून तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. 


आरोग्य - त्वचेशी संबंधित काही समस्या असू शकतात. 


कुटुंब - कुटुंबातील घरगुती वादांपासून अंतर ठेवा. तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मकर रास 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


व्यवसाय -  बाजारातील अचानक झालेल्या बदलांमुळे सोन्याच्या व्यवसायात नफा झाल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल. 


नोकरी - कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीमुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.  


कुटुंब - आज कुटुंबात अनेक मोठ्या निर्णयांवर संभाषण होईल. तुमचा सहभागही यात महत्त्वाचा आहे. 


आरोग्य -तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या आणि डाएट चार्ट फॉलो करा 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


व्यवसाय - भागीदारीत व्यवसाय करत असताना काळजी घ्या. अतिविश्वास तुम्हाला महागात पडू शकतो. शूल योग तयार झाल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचा पगार वाढेल.


नोकरी - नोकरी करणाऱ्या लोकांची चांगली प्रगती होऊ शकते.  ऑफिसमध्ये कठोर आणि प्रामाणिकपणे काम करा, यामुळे तुमच्या कामाची प्रशंसा तर होईलच पण पदोन्नतीची शक्यताही निर्माण होईल. 


प्रेमसंबंध - तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही बदलांना सामोरे जावे लागेल. 


आरोग्य - आज तुम्हाला किंचित डोकेदुखीचा सामना करावा लागेल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


व्यवसाय -  व्यवसायातील समस्या सोडवल्याने तुमचा ताण काही प्रमाणात कमी होईल.वेळ आणि परिस्थिती लक्षात घेऊन नाते दृढ करणे आवश्यक आहे.


नोकरी - तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करावं लागेल.मेहनतीला पर्याय नाही. 


कुटुंब - कुटुंबियांबरोबर आजचा दिवस आनंदात जाईल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा.  


आरोग्य - आज तुमची प्रकृती अगदी ठणठणीत असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Ram Navami 2024 : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामनवमीला घडतोय 'हा' दुर्मिळ योगायोग; 'या' राशीच्या लोकांना मिळणार लाभ, संपत्तीत होईल भरभराट