Shani Rahu Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी आणि नक्षत्र बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनासह संपूर्ण देशावर आणि जगावर दिसून येतो. 8 जुलै रोजी राहुने शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि तिथे तो 18 महिने राहणार आहे. हा काळ काही राशींसाठी भाग्याचा ठरेल. या काळात या राशींच्या संपत्तीतही अफाट वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
राहू आणि शनीचा दुर्मिळ योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण राहु तुमच्या राशीतून तिसऱ्या घरात गोचर करत आहे , तर शनिदेव तुमच्या राशीतून धन आणि वाणी घरामध्ये गोचर करत आहेत. त्यामुळे यावेळी तुमचं धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल. व्यवसायात उत्पादन आणि नफा वाढेल. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचेही सहकार्य मिळेल. या काळात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं.
वृषभ रास (Taurus)
राहु आणि शनीची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण राहु तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या घरात प्रवेश करत आहे आणि शनि तुमच्या राशीतून कर्म गृहात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी मिळू शकते.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनीचा दुर्मिळ संयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण राहु ग्रह तुमच्या राशीतून दहाव्या घरात आणि शनी तुमच्या राशीतून नवव्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीत तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो आणि तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: