Numerology Mulank 5 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 5 असलेल्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
मूलांक 5 च्या मुली या स्वभावाने अत्यंत बालिश असतात. कितीही मोठ्या झाल्या तरी त्या लहान मुलांसारख्याच वागतात. त्यांना प्रत्येक गोष्ट ही नीट समजावून सांगावी लागते, तेव्हा कुठे या मुली गोष्टी नीट समजून घेतात. या मुली स्वभावाने हट्टी देखील असतात. मूलांक 5 वर बुध ग्रहाचं राज्य आहे, या क्रमांकाचा ग्रह बुध आहे, त्यामुळे ते स्वभावाने निर्मळ असतात. 5, 14 किंवा 23 जन्मतारखेच्या मुली नेहमी आनंदी असतात. मूलांक 5 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
कितीही वय वाढलं तरी बालिशपणा राहतो कायम
मूलांक 5 च्या मुली स्वभावाने अत्यंत बालिश असतात. त्यांचा खोडसाळपणा हा नेहमी सुरुच असतो. प्रत्येक गोष्टीसाठी त्या अतिउत्साही असतात. त्यांना कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसतं, या मुलींना एक गोष्ट दहा वेळा समजून सांगावी लागते. या मुलींचं मन मात्र निर्मळ असतं, त्या कधीही कुणाविषयी वाईट चिंतत नाहीत.
खूप बोलक्या असतात या मुली
5, 14 किंवा 23 जन्मतारखेच्या मुली या खूप बोलक्या असतात. यांच्या तोंडाचा पट्टा कायम सुरू असतो. सतत बडबड करण्याची त्यांना सवय असते. एखाद्या शांत माणसालाही त्या बोलण्यास भाग पाडतात. या मुली इतरांवर अगदी सहज छाप पाडू शकतात. कधी कधी यांच्या अति बडबडीमुळे समोरच्याचं डोकं दुखतं.
नेहमी आनंदी राहतात
मूलांक 5 च्या मुली कधीच कसलं टेन्शन घेत नाही. त्या एकदम बिनधास्त राहतात. कधीच मनात काही ठेवत नाहीत. जे आहे ते तोंडावर सहजपणे बोलून टाकतात. प्रतिकूल स्थितीवर हसत हसत मात करण्याची कला त्यांच्याकडे असते, म्हणूनच त्या नेहमी आनंदी राहतात.
पती आणि सासरच्या लोकांसाठी ठरतात भाग्यवान
अंकशास्त्रानुसार, ज्या मुलींची मूलांक संख्या 5 असते, त्या मुली पती आणि सासरच्यांसाठी भाग्यवान समजल्या जातात. तसेच या मुली सासरच्या घरात राज्य करतात, या मुली खुल्या मनाच्या असतात. आई-वडिलांच्या घराव्यतिरिक्त त्यांना सासरच्यांकडून आणि पतीकडून खूप प्रेम मिळतं. या मुली त्यांच्या कुटुंबाला सोबत घेऊन जातात. शिवाय, त्या त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून चालतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :