मुंबई : आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. म्हणूनच नोकरदार आयटीआर भरण्यासाठी लगबग करत आहेत. मात्र प्रत्यक्ष आयटीआर भरताना अनेकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड् अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (ICAI) या संघटनेने याच अडचणी प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे. या सघटनेने प्राप्तिकर विभागाला सविस्तर पत्र लिहिले असून आयटीआर भरण्यासाठीची शेवटची मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे.  


मिळालेल्या माहितीनुसार ICAI ने प्राप्तिकर विभागाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आयटीआर भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा उल्लेख करणअयात आला आहे. ICAI  संघटनेचे अध्यश्र चार्डर्ड अकाउंटन्ट्स पीयुष एस छाजेड यांनी 5 जुलै 2024 रोजी हे पत्र लिहिले आहे. ई-पोर्टल फाइलिंगशी निगडित असलेल्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या समस्यांमुळे करदात्यांना फॉर्म 26AS/AIS/TIS या फॉर्म्सबाबत अडचणी येत आहेत. म्हणूनच आयटीआर भरण्याची शेवटची तारीख वाढवावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. 


ई-फायलिंग पोर्टलवर नेमक्या अडचणी काय?


फॉर्म 26AS/AIS/TIS अॅक्सेस करताना अडचणी 


ICAI ला ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर भरताना अनेक अडचणी दिसून आल्या. यातील सर्वांत महत्त्वाची अडचण ही 26AS/AIS फॉर्म अॅक्सेस करता येत नाहीये. TIS आणि AIS च्या आकड्यांमध्येही अडचणी दिसून येत आहेत. परिणामी आयटीआर भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय.


प्राप्तिकर तसेच फॉर्म 26AS नुसार, व्याजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न, टीडीएस आदी भरलेला डेटा मिसमॅच आहे. आखड्यांत तफावत असल्यामुळे आयटीआर भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय.


एररचा येतोय मेसेज 


करदात्यांच्या मतानुसार ते जेव्हा आयटीआर भरण्यासाठी एररचा मेसेज येतोय. आयटीआर जमा होत नाहीये.


ओटीपी न मिळणे 


आयटीआर दाखल करण्यासाठी तसेच इतर ओळख पटवण्यासाठी ओटीपी महत्त्वाचा असतो. मात्र करदाते जेव्हा ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करतात तेव्हा त्यांना ओटीपी मिळत नाहीये. परिणामी करदात्यांना त्यांचा आयटीआर भरता येत नाहीये. 


दरम्यान, या अडचणींमुळे प्राप्तिकर विभाग आयटीआर भरण्याच्या मुदतीत वाढ करणार का? असे विचारले जात आहे. 


हेही वाचा :


Free Tablet Scheme : केंद्र सरकारकडून खरंच मोफत टॅब्लेट दिले जात आहेत? जाणून घ्या सत्य काय?


श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्यूला, जाणून घ्या काय आहे 15-15-15 सूत्र?


मोठी बातमी! 'या' एका कंपनीसाठी गुगल मोजणार अब्जो डॉलर्स, लवकरच होणार सर्वांत मोठा करार