Jyeshtha Purnima 2024 : ज्योतिषशास्त्रात एकूण 16 तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये पौर्णिमा (Jyeshtha Purnima) देखील विशेष महत्त्व आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्यात पौर्णिमा असते. अशा प्रकारे एका वर्षात 12 पौर्णिमा आहेत. पौर्णिमा तिथीची देवता चंद्र देव आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी गरिबांना दान दिले जाते.
पौर्णिमा तिथी हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्याचा विशेष दिवस आहे. सध्या ज्येष्ठ महिना सुरू असून लवकरच ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा येणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमा विशेष आहे कारण ती एक नव्हे तर दोन दिवस चालणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेचे व्रत कधी करावे आणि पौर्णिमेला स्नान आणि दान कधी करावे? ज्येष्ठ पौर्णिमेची तारीख नेमकी कोणती? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ज्येष्ठ पौर्णिमा कधी?
पंचांगानुसार, जेष्ठ महिन्याची पौर्णिमा शुक्रवार, 21 जून रोजी सकाळी 07:32 पासून सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार, 22 जून रोजी सकाळी 06:37 पर्यंत असणार आहे. अशा प्रकारे पौर्णिमा तिथी दोन दिवस चालणार आहे.
ज्येष्ठ पौर्णिमा 2024 शुभ तिथी आणि वेळ
चंद्रोदयाची स्थिती पाहून पौर्णिमेचे व्रत पाळले जाते. त्यामुळे 21 जूनला पौर्णिमेचा आरंभ होईल. त्यानुसार 21 जूनला पौर्णिमा व्रत पाळण्यात येईल. तर पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानुसार स्नान आणि दान केले जाते. या संदर्भात 22 जून रोजी सकाळी स्नान आणि दान करण्यात येणार आहे. या दिवशी स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
ज्येष्ठ पौर्णिमेला तुळशीचा 'हा' उपाय करा
ज्येष्ठ पौर्णिमेला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुळशीचा उपाय करून पाहा. यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून घराची साफसफाई करावी. त्यानंतर स्नान करून मंदिर स्वच्छ करावे. तुळशीसह शालिग्रामची स्थापना करा. त्यांना गंगाजल, पंचामृत आणि जल अर्पण करा. त्यानंतर शेंदूर, गोपी चंदन आणि हळद यांचा टिळा लावावा. तुळशीचे रोप आणि शालिग्रामला सजवा. त्यांची पूजा करा. तुपाचा दिवा लावावा. फळे, मिठाई इत्यादींचा सात्विक नैवेद्य दाखवावा आणि वैदिक मंत्रांचा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: