Jyeshtha Amavasya 2024 : हिंदू धर्मात, ज्येष्ठ अमावस्येला फार महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान, दान करण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात एक अमावस्या येते. ही अमावस्या कृष्ण पक्षाची 15 वी तिथी आहे. अशातच ज्येष्ठ अमावस्या आषाढ महिन्याच्या कृष्ण अमावस्या तिथीला येणारी आहे. यावेळी ती 5 जुलै की 6 जुलै रोजी साजरी करण्यात येणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


ज्येष्ठ अमावस्या नेमकी कधी? 


ज्येष्ठ अमावस्येची योग्य तारीख जाणून घेण्याआधी त्याची तिथी आणि प्रारंभ जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर, ज्येष्ठ अमावस्या तिथीला सूर्योदय कोणत्या दिवशी आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथीची सुरुवात 5 जुलै रोजी पहाटे 04.57 वाजता होणार आहे. तर या दिवशी सूर्योदय 05 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे. या तिथीची समाप्ती 6 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. तर, याच दिवशी सूर्योदय पहाटे 05 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे. 


5 जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी ज्येष्ठ अमावस्या तिथी असणार आहे. तर, 6 जुलै रोजी अमावस्या तिथी सूर्योदय पासून सुरु होऊन ती पूर्वेला संपणार आहे. ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी 5 जुलै रोजी होणार आहे. 


ध्रुव योग आणि आर्द्रा नक्षत्रात यावेळची ज्येष्ठ अमावस्या आहे. या दिवशी ध्रुव योग प्रात:काळपासून ते 6 जुलै रोजी पहाटे 03 वाजून 49 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, आर्द्रा नक्षत्र प्रात:काळपासून ते 6 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 06 मिनिटांपर्यंत असणार आहे. 


ज्येष्ठ अमावस्या तिथीत 20 मिनिटांचा सर्वार्थ सिद्धी योग


ज्येष्ठाची अमावस्या तिथीत सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. मात्र, हा योग 6 जुलै रोजी जुळून येणार आहे. हा योग 6 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 06 मिनिटांपासून सुरु होणार आहे तो 05 वाजून 29 मिनिटांपर्यंत असणार आहे. अमावस्या तिथी 6 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 26 मिनिटांपर्यंत असणार आहे. अशातच हा योग 20 मिनिटांचा असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा एक शुभ योग आहे. यामध्ये केलेल्या कार्यांना यश मिळतं.


ज्येष्ठ अमावस्येचे उपाय 


1. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणत्याही एका पवित्र नदीतून स्नान करावे. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार, अन्न, वस्त्र, फळ आणि एका पात्राचं दान नक्की करावं. यामुळे तुम्हाला पुण्य लाभ मिळेल. यामुळे तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. 


2. ज्येष्ठ अमावस्येच्या वेळी प्रात:काळी स्नान केल्यानंतर पितरांचं स्मरण करा. तसेच, काळे तीळ, सफेद फूल आदी गोष्टी अर्पण करा. यामुळे पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात. यामुळे धन, दौलत, सुख, समृद्धीत वाढ होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Budh Pradosh Daan : बुध प्रदोषदिनी 'या' 3 खास गोष्टी करा दान, ग्रह दोषांपासून मिळेल मुक्ती; भगवान शंकरही होतील प्रसन्न