Budh Pradosh Daan : भगवान महादेवाला (Lord Shiva) प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत फार महत्त्वाचं मानलं जातं. हिंदू धर्मात हे व्रत फार महत्त्वाचं आहे. प्रदोष व्रक प्रत्येक महिन्याच्या दोन दिवशी म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष तिथीला करण्याची परंपरा आहे. प्रत्येक दिवसाच्या अनुसार या व्रतााला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जसे की, सोमवारी सोम प्रदोष त्याचप्रमाणे बुधवारी असल्यास बुध प्रदोष (Bud Praddosh Vrat) व्रत ठेवले जाते.
प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची प्रदोष मुहूर्तात पूजा केली जाते. असं म्हणतात की, बुध प्रदोष व्रत ठेवल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होते. याच्याच व्यतिरिक्त दान करणाऱ्यालाही विशेष महत्त्व आहे. यामुळे तुम्हाला सुख-शांती आणि समृद्धी प्राप्त होते. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात ते जाणून घेऊयात.
1. अन्न दान
भुकेल्याला तसेच गरजूंना अन्न दान करणं नेहमीच पुण्याचं काम मानलं जातं. त्यामुळे बुध प्रदोष व्रताच्या दिवशी अन्न दान केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा मिळू शकते. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी गव्हासह, मूग, उडीद , मसूरसारख्या डाळींचं दान देखील करू शकता. हे दान केल्याने ग्रह दोष समाप्त होतात असं म्हणतात.
2. वस्त्र दान
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी वस्त्रांचं दान केल्याने भगवान बुध आणि भगवान शंकराची कृपा राहते. उन्हाळ्याच्या दिवशी सुती तर थंडीच्या दिवसांत ऊबदार कपडे दान केल्याने शुभ फळ मिळते. हे दान तुम्ही सूर्योदयाच्या वेळी देखील करू शकता.
3. तिळाचं दान
तिळाला शनी आणि राहू ग्रहाचा कारक मानला जातो. अशातच बुध प्रदोष व्रताच्या दिवशी तिळाचं दान केल्याने या ग्रहांशी संबंधित दोषांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर हे दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :