Jyeshtha Amavasya 2024 : हिंदू धर्ममान्यतेनुसार तसेच पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातून एकदा अमावस्या (Jyeshtha Amavasya) येते. त्यानुसार, हिंदू धर्मात अमावस्या  तिथीला फार महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे. त्यानुसार, आज म्हणजेच 5 जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या पाळली जाणार आहे. 


ज्येष्ठ अमावस्या तिथीचा शुभ मुहूर्त 


हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथीची सुरुवात 5 जुलै रोजी पहाटे 04.57 वाजता होणार आहे. तर या दिवशी सूर्योदय 05 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे. या तिथीची समाप्ती 6 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. तर, याच दिवशी सूर्योदय पहाटे 05 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे. 


हलहरिणी अमावस्या


अमावास्येच्या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो. या दिवशी पितरांचं तर्पण केलं जातं. या दिवसाला हलहरिणी अमावास्या असंही म्हटलं जातं, म्हणूनच या दिवशी नांगराचीही पूजा केली जाते. पंचांगानुसार वर्षातील सगळ्याच अमावास्यांना काही विधी आणि पूजा केल्या जातात, पण या अमावास्येला पूजा आणि स्नान करून पितरांचं तर्पण केलं जातं.


ज्येष्ठ अमावस्येचे उपाय 


1. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणत्याही एका पवित्र नदीतून स्नान करावे. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार, अन्न, वस्त्र, फळ आणि एका पात्राचं दान नक्की करावं. यामुळे तुम्हाला पुण्य लाभ मिळेल. यामुळे तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. 


2. ज्येष्ठ अमावस्येच्या वेळी प्रात:काळी स्नान केल्यानंतर पितरांचं स्मरण करा. तसेच, काळे तीळ, सफेद फूल आदी गोष्टी अर्पण करा. यामुळे पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात. यामुळे धन, दौलत, सुख, समृद्धीत वाढ होते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Jyeshtha Amavasya 2024 : 5 की 6 जुलै? यंदाची ज्येष्ठ अमावस्या नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि उपाय