July 2024 Grah Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्यात 4 मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत. जुलैमध्ये मंगळ, बुध, सूर्य आणि शुक्र ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सर्व प्रथम, शुक्र (Venus) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल आणि लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होईल. त्यानंतर मंगळ (Mars) मेष राशीतून वृषभ राशीत जाईल आणि त्याचा सूर्य-गुरू यांच्याशी संयोग होईल. त्यानंतर सूर्य (Sun) मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. त्यानंतर बुध (Mercury) कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत जाईल. या ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक योग तयार होत आहेत, ज्याचा जबरदस्त लाभ 5 राशींना होईल. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? पाहूया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना जुलैमध्ये ग्रहाच्या संक्रमणामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आदर वाढेल. प्रतिष्ठित लोकांशी तुमचा संवाद वाढेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये त्याचा फायदा होईल. या महिन्यात तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात आणि त्यामुळे कुटुंबातील आनंद वाढेल. या काळात तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकतात. अनावश्यक खर्च टाळा आणि हुशारीने काम करा.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना खूप खास असेल. तुमच्या मनात एक प्रकारचा संभ्रम असेल, परंतु कठोर परिश्रम केल्याने तुमचं धैर्य वाढेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. या महिन्यात तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप व्यस्त असाल. तुम्ही तुमचा स्वभाव शांत ठेवा आणि विनाकारण कोणावरही रागावू नका. या महिन्यात तुमच्या कुटुंबात काही पूजा किंवा शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी जुलै महिना आनंददायी असेल, या महिन्यात तुम्हाला धार्मिक कार्यात खूप रस असेल. नोकरीत अधिकारी तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करतील. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. मित्रांसोबत सावधगिरीने राहा आणि कोणावरही अंध विश्वास ठेवू नका.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना आर्थिक लाभाने भरलेला असेल, या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये प्रचंड वाढ होईल. तुमच्या घरात शुभ कार्ये होऊ शकतात. या महिन्यात तुम्हाला जमीन, वास्तू आणि वाहनाचं सुख मिळू शकतं. तुमच्या घरातील विवाहयोग्य सदस्याचं लग्न ठरू शकतं आणि या महिन्यात तुमचं जीवन सुख-सुविधांनी भरलेलं असेल. तुमचा मन फ्रेश करण्यासाठी तुम्ही या महिन्यात तुमच्या कुटुंबासोबत फिरायला देखील जाऊ शकता.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप लाभाचा आहे. एकीकडे, तुमच्याकडे पदोन्नतीच्या संधी आहेत आणि दुसरीकडे, तुम्हाला संपत्ती आणि ज्ञान दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील आणि तुम्हाला व्यवसायातही चांगला नफा होईल. तथापि, महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागेल. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. या महिन्यात तुम्हाला काही अनिष्ट प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं. महिन्याच्या शेवटी तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Numerology : अत्यंत निरागस असतात 'या' जन्मतारखेचे लोक; फसवणूक, कपटीपणा यांच्या रक्तातच नाही, एखाद्याचं षडयंत्रही यांना समजत नाही