Jaya Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशी (Ekadashi) तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. आज माघ महिन्यातील एकादशी, म्हणजेच जया एकादशी आहे. यंदा या एकादशीचं महत्त्व आणखी वाढलं आहे, कारण या दिवशी 4 शुभ योगांची निर्मिती झाली आहे. या दिवशी पूजा, व्रत, उपवास करणाऱ्यांवर लक्ष्मी-नारायणाची विशेष कृपावृष्टी होईल. या पार्श्वभूमीवर जया एकादशीचा मुहूर्त आणि या दिवशी येणाऱ्या शुभ योगांबद्दल जाणून घेऊया.


जया एकादशी पूजा मुहूर्त 2024 (Jaya Ekadashi Puja Muhurta)



  • माघ शुक्ल जया एकादशी प्रारंभ वेळ - 19 फेब्रुवारी 2024, सकाळी 08.49

  • माघ शुक्ल जया एकादशी तिथी समाप्त - 20 फेब्रुवारी 2024, सकाळी 09.55

  • विष्णू पूजेची वेळ - 20 फेब्रुवारी 2024, सकाळी 09.45 ते दुपारी 02.00 पर्यंत

  • जया एकादशी उपवास सोडण्याची वेळ - 21 फेब्रुवारी 2024, सकाळी 06.55 ते 09.11


जया एकादशी 2024 शुभ योग (Jaya Ekadashi 2024 Shubh Yog)



  • त्रिपुष्कर योग - दुपारी 12.13 ते सकाळी 06.55 (22 फेब्रुवारी)

  • रवि योग - सकाळी 06.56 ते सकाळी 12.13

  • प्रीती योग - 19 फेब्रुवारी 2024, दुपारी 12.01 ते 20 फेब्रुवारी 2024, सकाळी 11.46

  • आयुष्मान योग - 20 फेब्रुवारी 2024, सकाळी 11.46 ते 21 फेब्रुवारी 2024, सकाळी 11.51


जया एकादशीच्या दिवशी काय करावं? (What To Do On Jaya Ekadashi?)



  • जया एकादशीच्या दिवशी श्रीहरीला पिंपळाच्या पानावर दूध आणि केशराची मिठाई अर्पण करावी. एक दिवस आधीच पिंपळाचं पान तोडून टाका, तर त्याच दिवशी ते पान तोडावं. या उपायाने जीवनातील संकटं दूर होतात, आर्थिक संकट उद्भवत नाही, अशी मान्यता आहे. जीवनात सुख-शांति लाभते.

  • जया एकादशीच्या दिवशी विष्णु सहस्रनामाचा जप करा आणि गरजूंना मदत करा. 14 मुखी दिवा लावून विष्णूचं ध्यान करा, पूजा करा. या उपायाने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो, प्रेमविवाहाचा मार्ग सोपा होतो.


जया एकादशी व्रताचं महत्त्व (Jaya Ekadashi Significance)


हिंदू पुराणात एकादशी तिथीला व्रत उपवास करण्याचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना या व्रताबद्दल सांगितलं होतं. हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. तसेच मानसिक आराम मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी उपवास करणं आवश्यक आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला चुकूनही करू नका 'ही' कामं; होणार नाही फलप्राप्ती