Shani Asta 2024 : शनि सध्या कुंभ राशीत विराजमान आहे आणि त्याच राशीत शनि (Shani) अस्त स्थितीत आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान प्राप्त आहे. शनीला पापी आणि क्रूर ग्रह समजलं जातं. प्रत्येक व्यक्ती शनीच्या अशुभ परिणामांना घाबरतो, पण असं नाही की शनि केवळ व्यक्तीच्या जीवनात अडथळेच आणतो. शनिदेव कधी कधी शुभ फळ देखील देतात. शनिदेव शुभ स्थितीत असल्यावर व्यक्तीचं नशीब फळफळतं. गरिबालाही अचानक श्रीमंत बनवण्याची ताकद शनीमध्ये आहे.
सध्या 17 मार्चपर्यंत शनि कुंभ राशीत अस्त स्थितीत राहणार आहे. शनि अस्त स्थितीत असेपर्यंत काही राशींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात काही राशींच्या जीवनात अनेक समस्या येतील, कामादरम्यान त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. शनीच्या या स्थितीचा कोणत्या राशींवर अशुभ परिणाम होणार? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
शनीच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. या काळात तुम्हाला कपटी लोकांपासून सावध राहावं लागणार आहे. या राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती चालू आहे, त्यातच शनीच्या अस्तामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. मकर राशीच्या लोकांना करिअर क्षेत्रात खूप त्रास होईल. तुमच्या प्रगतीत अडथळे येतील, नोकरीत बढती थांबू शकते. ऑफिसमध्ये तुमचे काम बिघडू शकते आणि त्यामुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. या काळात मकर राशीच्या लोकांचे आरोग्यही बिघडू शकते. कुटुंबात वादाची स्थिती निर्माण होईल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांवर देखील सध्या शनीची साडेसती सुरू आहे. शनीच्या अस्तादरम्यान कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. घरातील प्रौढ व्यक्तीला आरोग्याच्या समस्या जाणवतील. या काळात कोणताही निर्णय घेण्यात घाईगडबड करू नका. तुम्ही वाईट लोकांच्या संगतीत येऊ शकता. या काळात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो, जोडीदाराशी वाद इतके वाढू शकतात की त्यामुळे विभक्त होण्याची शक्यता आहे. शनीच्या अशुभ प्रभावामुळे कुंभ राशीचे लोक काही मोठ्या आजाराला बळी पडू शकतात, तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. या काळात व्यवसायात कोणतीही जोखीम घेऊ नका.
मीन रास (Pisces)
शनि अस्त अवस्थेत असताना मीन राशीच्या लोकांवर सर्वात जास्त नकारात्मक प्रभाव टाकेल. मीन राशीचे लोक यावेळी शनीच्या प्रभावामुळे त्रासलेले असतील. तुमची प्रलंबित कामं या काळात अजून रखडली जातील. कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. एखादी मोठी समस्या निर्माण होईल असे काम करू नका. व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला नशीब साथ देणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani 2024 : शनीचा कुंभ राशीत होणार उदय; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, आर्थिक लाभाचेही योग