Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये शनीला (Shani Dev) फार महत्त्व आहे. शनीला (Lord Shani) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. वैदिक पंचांगानुसार, शनी वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच शनी वक्री आणि मार्गी चालसुद्धा चालतात. ग्रहांच्या संक्रमणाचा जसा राशींवर (Zodiac Signs) परिणाम होतो तसाच वक्री आणि मार्गीचाही परिणाम होतो. 


वैदिक पंचांगानुसार, नवीन वर्ष 2025 मध्ये शनी 138 दिवस वक्री चाल म्हणजेच उलट दिशेने चालणार आहे. यामुळे काही राशींचं संकट वाढण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. पंचांगानुसार, शनी 13 जुलै 2025 रोजी सकाळी 09 वाजून 36 मिनिटांपासून शनी वक्री चाल चालणार आहेत. शनी 28 नोव्हेंबरपर्यंत याच राशीत स्थित असणार आहेत. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शनीच्या वक्रीमुळे 2025 मध्ये वृषभ राशीच्या लोकांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे ऑफिसमध्ये वाद होऊ शकतात. यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली नसणार. तुम्हाला पोटाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहवं लागेल. या काळात कोणताही निर्णय घेताना तुम्हाला जपून घ्यावं लागेल. तुमचे निर्णय चुकूही शकतात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांनाही शनीच्या वक्री चालीचा अशुभ परिणाम होऊ शकतो. तुमच्या कामकाजात नुकसान होऊ शकतं. तसेच, तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, जे विवाहित लोक आहेत त्यांच्यामध्ये अनेक वादविवाद होऊ शकतात. तुमच्या व्यवसायात तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्यवसायात कोणतीच जोखीम घेऊ नका. 


सिंह रास (Leo Horoscope)


शनीच्या वक्री चालीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. तसेच, तुमच्या आरोग्यातही चढ-उतार जाणवू शकतो. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर 2025 हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                   


Horoscope Today 31 December 2024 : आज थर्टी फर्स्ट; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य