Janmashtami 2024 Lucky Zodiacs : गोकुळाष्टमी ही श्रावण महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. गोकुळाष्टमीला जन्माष्टमी (Janmashtami 2024) असंही म्हणतात. यंदा जन्माष्टमीचा सण 26 ऑगस्ट अर्थात सोमवारी साजरा केला जाणार आहे. यंदा जन्माष्टमीला अत्यंत शुभ योग तयार झाले आहेत.


ज्योतिषशास्त्रानुसार, 26 ऑगस्टपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. या काळात काही राशींना सुखाचे दिवस येतील आणि श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने या राशी राजासारखं जीवन जगतील. 26 ऑगस्टपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.


जन्माष्टमी 2024 शुभ योग (Janmashtami 2024 Shubh Yog)


जन्माष्टमीला अनेक राजयोग तयार होत आहेत, ज्यामुळे अनेक राशींचं निद्रिस्त भाग्य जागृत होईल, श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने व्यवसाय, नोकरी आणि धनात वृद्धी होईल. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योग, षष्ठ राजयोग तयार होईल. तसेच कर्क राशीत बुधाचा उदय होईल.


26 ऑगस्टपासून या राशींना सोन्याचे दिवस (Janmashtami 2024 Lucky Zodiacs)


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना गोकुळाष्टमीला घडणाऱ्या दुर्मिळ योगाचा अधिक फायदा होईल. तुमची नोकरी-व्यवसायातील स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमच्यासमोरील आव्हानं कमी होतील. जुन्या मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल आणि तुमची आर्थिक प्रगती होईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी गोकुळाष्टमीचा सण भाग्याचा ठरेल. यावेळी तुमच्या मुलांना काही मोठं यश मिळू शकतं. तुम्हाला भेडसावत असलेल्या पैशाच्या समस्या या काळात संपतील आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. गुंतवणुकीतून लाभ होईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी गोकुळाष्टमी खास भेट घेऊन येत आहे. या काळात तुमच्या व्यवसायात विस्तार होईल. तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमची चांगली कमाई होईल. तुमचं आरोग्य तंदुरुस्त राहील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Janmashtami 2024 : जन्माष्टमीला घरी आणा बाळकृष्णाची मूर्ती; सर्व अडचणी होतील दूर, वाढेल धनसंपत्ती, फक्त 'या' पद्धतीने करा पूजा