एक्स्प्लोर

Janmashtami 2024 : यंदाच्या जन्माष्टमीला 'अशी' करा भगवान श्री कृष्णाची पूजा; जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत आणि विधी

Janmashtami 2024 : यंदा जन्माष्टमीचा उत्सव उद्या म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे भगवान श्री कृष्णाची पूजा कशी करावी.

Janmashtami 2024 : जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी (Janmashtami 2024) साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

त्यानुसार, यंदा जन्माष्टमीचा उत्सव उद्या म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे भगवान श्री कृष्णाची पूजा कशी करावी आणि पूजेचा शुभ मुहूर्त काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  

जन्माष्टमीची पूजा कशी करावी? 

  • जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच, भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. 
  • श्रीकृष्णाचं दर्शन करताना त्यांना मोरपंख चढवा. 
  • जर काही कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच  भगवान श्री कृष्णाच्या फोटोला मोरपंख अर्पण करु शकता. 
  • या दिवशी भगवान श्री कृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. तसेच, श्रीकृष्णाला श्रृंगार अर्पण करा. 
  • संपूर्ण दिवस भगवान श्री कृष्णाची पूजा, आराधना करा. 
  • तसेच, मधल्या वेळेत ‘कृं कृष्णाय नम:’ असा भगवान श्री कृष्णाच्या नामाचा जप करा. 
  • रात्री 12 वाजता पूजेच्या आधी पुन्हा स्नान करा. 
  • त्यानंतर दक्षिणावर्ती शंखाने भगवान कृष्णला पंचामृताने अभिषेक करा. 
  • या दरम्यान तुम्ही देवाकडे मनातील इच्छा मागू शकता.
  • त्यानंतर भगवान श्री कृष्णाची परिवारासह आरती करा. 
  • त्यानंतर देवाला प्रसाद चढवून सर्वांना प्रसाद द्या.  

जन्माष्टमी 2024 कधी आहे? (Janmashtami 2024 Date)

यंदा 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू होत आहे. 27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल. 

जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Janmashtami 2024 Puja Muhurta)

कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असेल. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल.

जन्माष्टमी 2024 पूजा मंत्र (Janmashtami 2024 Puja Mantra)

जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी तुम्ही दोन मंत्र वापरू शकता.

1. ओम नमो भगवते वासुदेवाय ।

2. ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः।

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Janmashtami 2024 Date : श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
Trigrahi Yog 2026 : अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget