एक्स्प्लोर

Horoscope Today, September 6, 2022 : मेष, सिंहसह ‘या’ राशींसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी!  जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, September 6,  2022 : मेष राशीच्या लोकांनी नवे काम सुरु केल्याने आत्मविश्वास वाढेल. वृषभ राशीच्या लोकांनी कोणतेही नवे काम सुरु करू नये. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, September 6,  2022 : आज चंद्र धनु राशीत असून पूर्वाषाढा नक्षत्र आहे. सूर्य सध्या सिंह राशीत आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आहे. मेष राशीच्या लोकांनी नवे काम सुरु केल्याने आत्मविश्वास वाढेल. वृषभ राशीच्या लोकांनी कोणतेही नवे काम सुरु करू नये. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. जर तुम्ही आधी एखाद्याकडून कर्ज घेतले असेल, तर तो व्यक्ती आज तुम्हाला त्याबद्दल विचारू शकतो. काही प्रभावशाली लोकांशी भेट होईल, जी फायदेशीर ठरेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची प्रतिष्ठा वाढेल. कोणतेही नवीन काम केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

वृषभ (Taurus Horoscope) : शारीरिक अस्वस्थता आणि कामात यश मिळण्यास विलंब झाल्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका. आहाराची काळजी घ्या. आज कामाच्या प्रचंड ताणामुळे मनात काहीसा सुस्तपणा राहील. प्रवासातही अडथळे येऊ शकतात. योग, ध्यान आणि अध्यात्म यांचा अवलंब करून मनःशांतीवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर करण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन (Gemini Horoscope) : मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या जीवनसाथीला तब्येतीच्या कुरबुरी जाणवू शकतात. आज विरोधकांचा प्रभाव होईल. शत्रूचा नाश होईल. चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा विचार मनातून काढून टाका. मेहनत कराल तर नशिबाची साथ मिळेल.

कर्क (Cancer Horoscope) : धर्माबद्दल आदर वाढेल. व्यवसायात सुधारणा होईल. पालकांकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील. अनावश्यक राग आणि वाद टाळा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कामाचा ताण वाढेल. मन अस्वस्थ राहू शकते.

सिंह (Leo Horoscope) : आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. जर काही समस्या तुम्हाला बऱ्याच काळापासून भेडसावत असतील, तर आज त्यातून सुटका होईल. काही लोक एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, जिथे त्यांना सन्मानही मिळेल. जर जोडीदार तुमच्यावर एखाद्या गोष्टीमुळे रागावला असेल, तर त्यांची समजूत काढा आणि त्यांचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.

कन्या (Virgo Horoscope) : मन प्रसन्न राहील. वडिलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल, पण जास्त मेहनत घ्यावी लागेल. खर्चही जास्त होईल. वाचनाची आवड वाढेल. लेखन-बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. उत्पन्नही वाढेल. कामांना मान मिळेल. शैक्षणिक कामासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवा. कौटुंबिक वाद टाळा. कामाच तणाव येऊ शकतो.

तूळ (Libra Horoscope) : पैशांशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा आजचा दिवस असेल. तुमचा एखादा मित्रच तुमची फसवणूक करू शकतो. सावधगिरी बाळगा. कोणालाही कर्ज देणे टाळा. कौटुंबिक सदस्य तुमचा आदर करतील आणि काही मागण्या देखील करतील. आज तुमच्या वागण्यात थोडी चिडचिड होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुमच्या घरी येऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात प्रगती होईल. पैशाचा अचूक हिशेब ठेवा. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबात सुख-शांती राहील. गोड बोलून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक लोकांना थोडा थकवा जाणवेल. विचारांमध्ये नकारात्मकता येऊ शकते. प्रवास करू नका, घरी विश्रांती घेणे चांगले.

धनु (Sagittarius Horoscope) : व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. मुलांचे सहकार्य मिळणार नाही. मात्र, नशिबाची चांगली साथ मिळेल. कोर्टाच्या कामातही यश मिळेल. तुमचा ऑफिसचा वेळ चांगला जाईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. सरकारी मदत मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मन-सन्मान मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्ही धार्मिक आणि अध्यात्मिक कामांमध्ये अधिक व्यस्त असाल. पूजा किंवा धार्मिक कार्यात पैसा खर्च होईल. नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांशी सावधपणे बोला, कारण तुमच्या बोलण्याने कोणाला त्रास होऊ शकतो. जास्त मेहनत करूनही कमी यश मिळाल्याने निराशा येईल. वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही दिवस सामान्य आहे.

कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मान-सन्मान वाढेल. बेरोजगारीमुळे त्रासलेल्या लोकांना चांगला रोजगार मिळू शकतो. कोणतीही जमीन, वाहन, घर इत्यादी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. आज तुम्ही काही प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकता. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना नवीन पद किंवा बढती मिळू शकते.

मीन (Pisces Horoscope) : नोकरी किंवा व्यवसायात यश आणि उच्च अधिकाऱ्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला आनंद वाटेल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढेल आणि तुम्हाला कर्जाची रक्कम परतफेड करता येईल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ मिळेल. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दुपारचा वेळ कुटुंबीयांसोबत चांगला जाईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत

Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 November 2024PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Embed widget