(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today, September 4, 2022 : मेष ते मीन राशींसाठी कसा असेल रविवारचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today, September 4, 2022 : मेष राशीच्या लोकांना यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
Horoscope Today, September 4, 2022 : आज ज्येष्ठा नक्षत्र आहे. चंद्र वृश्चिक राशीत आहे. सूर्य सिंह आणि शनि आज मकर राशीत आहेत. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेले मतभेद संपतील. पद प्रतिष्ठा वाढू शकते. मान-सन्मान मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामे वेळेत पूर्ण होतील. कला क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज पुरस्काराने सन्मानित केले जाऊ शकते. आरोग्यासंबंधी काही समस्या उद्भवू शकतात. यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असेल. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्याशी संबंधित समस्या संपतील, तब्येत सुधारेल. कामात वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल, मान-सन्मान मिळेल. व्यवसायात येत असलेल्या अडचणी दूर होतील. लाभ होण्याची शक्यता आहे. काही लोकांना लोकांना सन्मान मिळेल. अध्यात्माची गोडी निर्माण होईल.
मिथुन (Gemini Horoscope) : आज तुमच्या मनात काही संभ्रम राहतील. कामाच्या ठिकाणी नवीन योजनांकडे लक्ष देत येणार नाही, त्यामुळे काम संथगतीने होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या लोकांना आता खूप मेहनत करावी लागेल, तरच त्यांना यश मिळू शकेल. कोणाकडून कर्ज घेतले असेल, तर ते वेळेवर परत करा, अन्यथा वाद होऊ शकतो.
कर्क (Cancer Horoscope) : मनःशांती लाभेल. स्वावलंबी व्हाल. अनावश्यक वाद टाळा. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. संभाषणात संयम ठेवा. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. पैशांची बचत न केल्यास भविष्यात मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
सिंह (Leo Horoscope) : व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज यश मिळू शकते. धनप्राप्तीमुळे कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांना आज यश मिळेल आणि ते चांगले नाव कमावू शकतील. परंतु, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणतेही नवीन काम सुरू करणार्या लोकांना आज थोडे सावध राहावे लागेल. कारण, त्यांच्या कामात कुटुंबीयच अडथळा आणू शकतात.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीमुळे तुमचा दबदबा कायम राहील. व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही दूरच्या ठिकाणी प्रवास करू शकता, जो फायदेशीर ठरेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. आरोग्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते.
तूळ (Libra Horoscope) : या दिवशी तुम्ही कोणतेही काम हाती घेतले, तर तुम्हाला त्यात यश मिळेल. ज्यांना परदेशात जायचे आहे, त्यांना आज ऑफर मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळाल्याने आनंद होईल. व्यवसायासाठी पैसे उधार घेतल्यास ते तुम्हाला सहज परत करता येतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन पद मिळेल. घरात एखादे मंगल कार्य पार पडू शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कार्यक्षेत्रात नव्या संधी चालून येतील. उत्पन्न वाढेल. कला आणि संगीताकडे कल राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मात्र, खर्च वाढतील. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. आईकडून आर्थिक पाठबळ मिळू शकते. एखाद्या धार्मिक स्थळी जावे लागू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे होतील.
धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत सुरू असलेल्या समस्या दूर होतील, तब्येत सुधारेल. जुने मित्र भेटतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस फलदायी असेल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील.
मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी असणार आहे. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी उत्साहाने एकत्र याल आणि ते वेळेत पूर्ण कराल. काही काळ व्यवसाय मंदावल्यामुळे व्यापार करणारे लोक नाराज झाले असतील, तर ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरु होतील. स्वतःची काळजी घ्या.
कुंभ (Aquarius Horoscope) : मन प्रसन्न राहील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मान-सन्मान मिळेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. सध्या प्रवास करणे टाळा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. स्वावलंबी व्हा. अति राग करणे टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. दिवस आनंदात जाईल.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस तुम्हाला क्षेत्रात एखादी अनपेक्षित मोठी संधी मिळवून देऊ शकतो. तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल, तर त्यात कोणतीही महत्त्वाची योजना सुरू करण्यासाठी संपूर्ण दिवस विचार कराल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना आज पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. लाभाच्या अनेक संधी आज तुमच्यासमोर येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या