एक्स्प्लोर

Horoscope Today, October 20, 2022 : वृषभ, सिंहसह ‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 20,  2022 : मेष राशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक समस्या दूर होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 20,  2022 : आज आश्लेषा नक्षत्र असून चंद्र कर्क राशीत असेल आणि सकाळी 10:30नंतर तो सिंह राशीत प्रवेश करेल. गुरु मीन राशीत आणि सूर्य तूळ राशीत भ्रमण करत आहे. मेष राशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक समस्या दूर होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रलंबित प्रकरणांकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्याही कायदेशीर प्रकरणात नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल, अन्यथा तुम्हाला त्यासाठी दंड होऊ शकतो. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope) : वृषभ राशीचे लोक कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील. मनाला शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक समस्या दूर होईल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. दिवाळीनिमित्त घरात स्वच्छतेवर भर दिला जाणार असून, सणानिमित्त जवळच्या व्यक्तीचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या सल्ल्याचे पालन करणारी व्यक्ती कार्यक्षेत्रात चांगले परिणाम देईल.

मिथुन (Gemini Horoscope) : आज दिवसभर शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि राग टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामाच्या ठिकाणी कष्टाचे होऊ शकते. कुटुंबात मान-सन्मान मिळेल. आत्मविश्वास भरपूर असेल. वाचनाची आवड निर्माण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. वाणीच्या प्रभावामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. मन चंचल राहील. धार्मिक कार्यावर खर्च वाढू शकतो. मित्रांच्या मदतीने व्यवसाय वाढू शकेल.

कर्क (Cancer Horoscope) : कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता. भौतिक वस्तूंमध्ये रुची वाढेल. भेटवस्तू मिळतील आणि सन्मान वाढेल. सर्जनशील प्रयत्नांना फळ मिळेल. सामाजिक कार्यात रस घ्याल.

सिंह (Leo Horoscope) : सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस परस्पर बंधुभावाचा राहील आणि नवीन अनुभव मिळतील. हे नवीन अनुभव भविष्यात खूप फायदेशीर ठरतील. प्रयत्नांना यश मिळेल. एखादी चांगली योजना तयार केली जाईल. अपेक्षेप्रमाणे आर्थिक परिस्थिती चांगली राहील. एखाद्याच्या गोपनीयतेचा भंग करू नका. प्रतिस्पर्ध्याचा पराभव होईल. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. आर्थिक बाबतीत प्रगती होईल.

कन्या (Virgo Horoscope) : आज एखादे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत असाल. वेळ खूप महत्वाचा आहे, कृपया तो सत्कारणी लावा. जर, तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता घेण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. परिश्रमापेक्षा परिणाम कमी असेल. विद्यार्थ्यांनी विचार आणि समजून घेण्यात जास्त वेळ दिल्यास कोणतीही संधी वाया जाऊ शकते.

तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. जर, तुम्ही मुलांच्या करिअरची काळजी करत असाल तर, चिंता करण्याची गरज नाही. उत्पन्नाचे विविध स्त्रोत देखील उपलब्ध होतील. परंतु, खर्चात देखील वाद होईल. आपल्याला आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : वृश्चिक राशीचे लोक त्यांना हवे ते काम करण्यात उत्सुक असतील. हा काळ तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. ऑफिसच्या कामावर तुमची पकड कायम ठेवावी लागेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ किंवा बक्षीस मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि दिवाळीची तयारी केली जाईल.

धनु (Sagittarius Horoscope) : राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. मेहनतही जास्त होईल. स्वावलंबी व्हा. कुटुंब तुमच्यासोबत असेल. व्यवसायात वाढ होईल. मन चंचल राहील. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खर्च जास्त होईल. आरोग्याबाबत जागरुक राहा. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल.

मकर (Capricorn Horoscope) : आज विचारपूर्वक पुढचे पाऊल टाकावे लागेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. काही शारीरिक वेदना होत असतील, तर त्यात निष्काळजीपणा टाळा. तुम्हाला काही निर्णय अतिशय हुशारीने घ्यावे लागतील. जबाबदारीचे पालन करण्यापासून मागे हटू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे काम मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही. तुमची साधी विचारसरणी लोकांना आवडेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : आत्मविश्वास कमी होऊ शकतो. शांत व्हा, राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल. शैक्षणिक कार्यात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope) : आज मीन राशीच्या लोकांना आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. काही लोक कुटुंबात आपले म्हणणे सिद्ध करण्यास उत्सुक असतील. सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता. दिवाळीच्या निमित्ताने घरात उत्साहाचे वातावरण असेल आणि काही खास पदार्थही बनवता येतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना तुमच्या मनात येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget