एक्स्प्लोर

Horoscope Today, October 15, 2022 : मेष, वृश्चिकसह ‘या’ राशींना होऊ शकतो धनलाभ! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, October 15, 2022: मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

Horoscope Today, October 15, 2022: आज मृगशीर्ष नक्षत्र असून, चंद्र सकाळी वृषभ राशीत असेल आणि नंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य कन्या राशीत आणि मंगळ वृषभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...

मेष (Aries Horoscope) : आज तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. नोकरीशी संबंधित काही बदल हवा असेल, तर ती इच्छाही पूर्ण होईल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी मनातील बोलणे टाळावे लागेल. एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. तुमच्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अचानक धनलाभ झाल्याने आनंदी व्हाल.

वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस आयुष्याला नवी दिशा देईल. काही बाबतीत नेतृत्व कराल ज्यात, इतर लोकांचेही सहकार्य असेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर संभाषणही होईल आणि तुम्हाला तुमचे मत मांडण्याची संधी मिळेल. तुमच्या विचारांना महत्त्व मिळेल. काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, जे भविष्यात उपयोगी पडेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सर्व कामे पूर्ण होतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आज तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भावनेच्याभरात फसण्याऐवजी तुम्ही समजूतदार व व्यावहारिक व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, या विश्वासाने तुम्ही पुढे जाऊ शकाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी वाद घालण्याची ही वेळ नाही. शांत राहण्याचा प्रयत्न करा. बोलण्यात संयम बाळगा.

कर्क (Cancer Horoscope) : आज तुमच्या चांगल्या विचाराने तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत महत्त्वाचा निर्णय घ्याल, परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील इतर सदस्यांशी जरूर बोला. कोणाचे ऐकून त्यावर अवलंबून राहून कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. जर, तुम्ही एखाद्यावर काही जबाबदारी सोपवलीत, तर ते वेळेत पूर्ण होईल.

सिंह (Leo Horoscope) : आज चांगल्या कामांमध्ये भाग घ्या. काही नवीन लोकांशी तुमची ओळख होईल. यामुळे हे लोक आगामी काळात तुमच्या कामी येऊ शकतात आणि तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान असेल. काही चांगली बातमी मिळू शकते. सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या (Virgo Horoscope) : मन प्रसन्न राहील. वैवाहिक सुखात वाढ होईल. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. कामाचा भार जास्त होईल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबात सुख-शांती राहील. व्यवसायाच्या विस्तारासाठी मित्राचे सहकार्य मिळू शकते. स्वावलंबी व्हा. आरोग्याबाबत जागरुक राहा. कुटुंबातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

तूळ (Libra Horoscope) : तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेची गुंतवणूक आणि योग्य हेतूने केलेला व्यवसाय या दोन्हीमुळे तुम्हाला दीर्घकाळ नफा मिळेल. जर, तुम्ही आज गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळतील. कोणतेही काम करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी नफा न मिळाल्याने थोडे दु:खी व्हाल. जर, तुम्ही याआधी एखाद्याला पैसे उधार दिले असतील, तर आज ते परत मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल परिस्थितीमुळे कोणतेही अवघड काम वेळेवर सहज पूर्ण करू शकाल. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आज मनापासून लोकांना मदत करतील.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. जुन्या मित्राला भेटायला जाल, जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला थकवा आणि तणाव जाणवू शकतो. चांगला आहार तंदुरुस्त राहण्यास मदत करेल. मुलांसोबत थोडा वेळ घालवू शकता. खाजगी शिक्षक आज मुलांना अभ्यासाच्या नवीन पद्धती शिकवतील, विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढेल.

मकर (Capricorn Horoscope) : अतिउत्साही होणे टाळा, अन्यथा तुम्ही घाईत काहीतरी चुकीचे काम करू शकता. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतील. आज तुम्हाला व्यवहाराशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू शकतो. काही विरोधक आज सक्रिय असतील, ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावे लागेल.

कुंभ (Aquarius Horoscope) : भांडवल गुंतवण्यापूर्वी खाजगी स्तरावर कंपनीची कायदेशीरता तपासून घ्या. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. वारंवार व्यवसायातील चढ-उतार, घरगुती वाद आणि सामंजस्याचा अभाव यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांच्या पाठिंब्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते.

मीन (Pisces Horoscope) : आज तुमच्या दिवसाची सुरुवात नव्या आशेने होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. विद्यार्थ्यांना करिअरची चिंता सतावेल. आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी मिळेल. या संधीचा नक्की लाभ घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Shravan 2026 : श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
Hindu Religion: श्रावण शुक्रवारी 'वैभवलक्ष्मी व्रत' का करतात? पुरूषही करू शकतात हे व्रत? शुक्रवारीच का करतात? व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
श्रावण शुक्रवारी 'वैभवलक्ष्मी व्रत' का करतात? पुरूषही करू शकतात हे व्रत? शुक्रवारीच का करतात? व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
Shubh Yog 6 August 2026 : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, बॅंक बॅलेन्स थेट चौपट वाढणार
आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, बॅंक बॅलेन्स थेट चौपट वाढणार

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Embed widget