एक्स्प्लोर

Horoscope Today, October 13, 2022 : वृषभ, कर्कसह ‘या’ राशींना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार! जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today, Octiber 13,  2022 : मेष राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य

Horoscope Today, Octiber 13,  2022 : आज कृतिका नक्षत्र असून चंद्र वृषभ राशीत आहे. गुरु मीन राशीत भ्रमण करत आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य

मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा गोंधळात टाकणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही सहकारी तुमच्या अडचणी वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि तुमच्या पदोन्नतीमध्ये अडथळा आणू शकतील. एखादा करार करताना तुमच्या मनात काय चालले आहे हे कोणालाही सांगणे टाळावे, अन्यथा तो त्याचा फायदा घेऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकेल.

वृषभ (Taurus Horoscope) : मन शांत राहील, पण विचारांमध्ये चढ-उतार असतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. एखाद्या मित्राकडून चांगले गिफ्ट मिळू शकते. कुटुंबात सुख-शांती नांदेल. जबाबदाऱ्या वाढू शकतात. मान-सन्मानही वाढेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागणे. अनावश्यक खर्च वाढतील.

मिथुन (Gemini Horoscope) : आज व्यापारी वर्गाला थोडे हुशारीने काम करावे लागेल, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागू शकते. मैत्री घट्ट होईल आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. जर, तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल, तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. घरगुती कामात व्यस्त राहाल.

कर्क (Cancer Horoscope) : भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. श्रमाचे चांगले फळ मिळेल. मुलांवरील विश्वास अधिक दृढ होईल. आजकुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि विशेष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. शत्रू नाराज होऊ शकतात. आज पालकांची विशेष काळजी घ्या. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. अनावश्यक खर्चांना नियंत्रित करा.

सिंह (Leo Horoscope) : आज तुम्हाला राजकारणात नवीन संधी मिळतील. राजकीय खेत्रात यश मिळेल. लव्ह लाईफच्या बाबतीत काही तणाव निर्माण होईल. मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एखादी वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. कुटुंबात सुख-शांती नांदेल. भेटवस्तू मिळेल आणि सन्मान वाढेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या (Virgo Horoscope) : कुटुंबासोबत कोणत्याही आध्यात्मिक कार्यात उत्तम वेळ जाईल. घरकाम आणि साफसफाईच्या कामात व्यस्त राहाल. करिअरशी संबंधित कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने तरुण उत्साही होतील. नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्चामुळे बजेट बिघडू शकते. आळशीपणामुळे तुमचे कोणतेही काम पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका.

तूळ (Libra Horoscope) : वाणीवर संयम ठेवा. नियमांविरुद्ध कोणतेही काम करू नका. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक अडचणी निर्माण होतील. खर्च त्रासदायक ठरू शकतात. कुटुंबासोबत दिवस घालवाल. आज तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन टार्गेट देखील मिळू शकते. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या दृष्टीकोनातून वेळ चांगला आहे.

वृश्चिक (Scorpio Horoscope) : भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे आणि एखादी मोठी डील फायनल झाल्याने चांगला नफा मिळू शकतो. महत्त्वाचे काम कोणत्याही सहकाऱ्याच्या मदतीने सहज पूर्ण करू शकाल. घरातील सदस्यांमधील वाद संवादाने मिटवण्याचा प्रयत्न करा. आर्थिकबाबींचे व्यवस्थित नियोजन करा.

धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी काही अडचणी आणेल, परंतु तरीही तुम्ही आपला व्यवसाय सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागेल आणि त्याचे कायदेशीर पैलू व्यवस्थित तपासावे लागतील, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन नोकरी मिळू शकते.

मकर (Capricorn Horoscope) : मनाचा संयम वाढेल. दिवसभर मन प्रसन्न राहील. जोडीदाराच्या तब्येतीत सुधारणा होईल. बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. उत्पन्न वाढेल. तुमच्या बोलण्याने एखाद्यावर प्रभाव होऊ शकतो. नोकरीत काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. पोटाचे विकार त्रासदायक ठरू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope) : आज तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल. सार्वजनिक ठिकाणी बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. स्थिर मालमत्ता आणि वाहने इत्यादींच्या कागदोपत्री कामात सावधगिरी बाळगा. महिला सौंदर्य प्रसाधने, कपडे आणि दागिने खरेदीवर पैसे खर्च करू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. एखाद्या नवीन नात्यात पुढे जाण्याची घाई तुमचे नुकसान करू शकते.

मीन (Pisces Horoscope) : सरकारी नोकरीत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. काही सरकारी योजनांचा लाभ मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमच्या आनंदात भर पडेल. कोणतेही अवघड काम सहजतेने पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल. आरोग्याबाबत जागरूक रहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget